व्यावसायिक अभ्यासक्रम केंद्र आजपासून वैभववाडीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्यावसायिक अभ्यासक्रम केंद्र आजपासून वैभववाडीत
व्यावसायिक अभ्यासक्रम केंद्र आजपासून वैभववाडीत

व्यावसायिक अभ्यासक्रम केंद्र आजपासून वैभववाडीत

sakal_logo
By

व्यावसायिक अभ्यासक्रम
केंद्र आजपासून वैभववाडीत

वैभववाडी, ता. १४ ः शालेय शिक्षण घेत असतानाचा विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाचे धडे गिरविता आले पाहिजेत, या हेतूने महालक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळाने एमकेसीएलचे तब्बल ३१ व्यावसायिक अभ्यासक्रम माधवराव पवार विद्यालयात सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या केंद्रांचे उद्‍घाटन उद्या (ता.१५) होणार आहे, अशी माहिती शिक्षण संस्थेचे सचिव जर्नादन नारकर यांनी दिली.
कोकिसरे येथील माधवराव पवार विद्यालयात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी संस्थेचे खजिनदार नंदकुमार आम्रसकर, संचालक रवींद्र नारकर, मुख्याध्यापक विनोद गोखले, पर्यवेक्षक शिवदास कदम आदी उपस्थित होते. श्री. नारकर म्हणाले, ‘‘दहावी, बारावी, पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर शाळेतील विद्यार्थी कोणती नोकरी करतात? कोणता व्यवसाय करतात? याचे सर्व्हेक्षण संस्थेच्या माध्यमातून पाच वर्षांपासून करीत होतो. प्रतिनिधीक स्वरूपात शाळेत शिक्षण पूर्ण केलेल्या २८९ विद्यार्थ्यांचे सर्व्हेक्षण केले. या सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती पुढे आली. १० टक्के विद्यार्थी करियर आपण निश्चित केलेल्या क्षेत्रात करताना आढळले. व्यावसायिक शिक्षण न मिळाल्यामुळे उर्वरित ९० टक्के विद्यार्थी मिळेल ती नोकरी करीत असल्याची बाब सर्वेक्षणातून समोर आली. या गंभीर विषयावर महालक्ष्मी शिक्षण संस्था कार्यकारिणीच्या सभांमध्ये अनेकदा सखोल चर्चा झाली. त्यातूनच शालेय शिक्षण देतानाच विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार व्यावसायिक शिक्षण देणे क्रमप्राप्त आहे, यावर एकमत झाले. त्यानुसार वर्षभर (एमकेसीएल)महाराष्ट्र नॉलेज कार्पोरेशन लिमिटेड या संस्थेचे केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्नशील होतो. त्यात यश आले. उद्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षी तहसीलदार रामदास झळके यांच्या हस्ते केंद्राचे उद्‍घाटन होणार आहे.’’

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87270 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..