३ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

३

sakal_logo
By

----------
पोफळी प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन मार्गी लावा

चिपळुणातील बैठकीत उद्योगमंत्री सामंतांच्या प्रांताधिकाऱ्‍यांना सूचना
चिपळूण, ता. १४ : पोफळी येथे सुरू असलेले कोयना प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन तातडीने मार्गी लावा, अशी सूचना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रांताधिकाऱ्‍यांना केली.
चिपळूण येथील शासकीय विश्रामगृहावर त्यांनी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी पोफळीतील आंदोलन तत्काळ संपवण्याची सूचना प्रशासनाला केली.
उद्योगमंत्री उदय सामंत चिपळूणला येताच त्यांच्या सर्व पक्षातील मित्र परिवारांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यांनी परशुराम घाटाची पाहणी केली. बहादूरशेख नाका येथे सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. राष्ट्रवादी युवकचे माजी तालुकाध्यक्ष मयुर खेतले, चिपळूण पंचायत समितीचे माजी सदस्य नितीन ठसाळे, खेर्डीचे माजी सरपंच दशरथ दाभोळकर यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर मंत्री सामंत यांनी बहादूरशेख नाका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यावेळी माजी नगराध्यक्ष सुरेखा खेराडे, उमेश काटकर, भरत गांगण आदी उपस्थित होते.
..
चौकट
..सुरू असलेले आंदोलन दुर्दैवी
दरम्यान, चिपळूण येथील बैठकीत आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना पोफळी येथे प्रकल्पग्रस्तांचे त्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेले आंदोलन दुर्दैवी आहे, अशा शब्दात मंत्री सामंत यांनी नाराजी व्यक्त केली. चिपळूणला धावती भेट देऊन त्यांनी सावर्डे येथे उद्योजक केतन पवार आणि पिंट्या पाकळी यांची सदिच्छा भेट घेतली आणि संगमेश्वरच्या दिशेने रवाना झाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87277 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..