स्फूर्तिगीतांनी कुडाळ देशभक्तीमय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्फूर्तिगीतांनी कुडाळ देशभक्तीमय
स्फूर्तिगीतांनी कुडाळ देशभक्तीमय

स्फूर्तिगीतांनी कुडाळ देशभक्तीमय

sakal_logo
By

43416
कुडाळ ः तहसील कार्यालयात आयोजित ‘ऐ मेरे प्यारे वतन’ कार्यक्रमप्रसंगी मान्यवर. (छायाचित्र ः अजय सावंत)


स्फूर्तिगीतांनी कुडाळ देशभक्तीमय

उत्स्फूर्त सहभाग; तहसील कार्यालयात ‘ऐ मेरे प्यारे वतन’ सोहळा

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १६ ः स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त तहसील कार्यालय, कुडाळ व रोटरी क्लब ऑफ कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ऐ मेरे प्यारे वतन’ देशभक्तीपर गीत गायन कार्यक्रम येथील महालक्ष्मी हॉलमध्ये झाला. कार्यक्रमात तहसीलदार अमोल पाठक यांनी ‘कर चले हम फिदा’ हे गाणे सादर करीत कार्यक्रमात रंगत आणली.
कार्यक्रमाचे उद्‌घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी तहसीलदार पाठक, कुडाळचे मुख्याधिकारी नितीन गाढवे, रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष अमित वळंजू, रोटरी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. राजीव बिले, असिस्टंट गव्हर्नर नीता गोवेकर, गव्हर्नर एरिया अॅड. प्रणय तेली, सेक्रेटरी दिनेश आजगावकर, इनरव्हील क्लब ऑफ कुडाळच्या उपाध्यक्षा ऋतुजा परब, इन्व्हेंट समन्वयक राजन बोभाटे, गव्हर्नर एरिया अॅड. गजानन कांदळगावकर आदी उपस्थित होते.
तहसीलदार पाठक यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या माध्यमातून कुडाळ तहसीलचे कर्मचारी, रोटरी क्लबचे सदस्य, इनरव्हील सदस्यांना कला सादर करण्याचे व्यासपीठ देऊन त्यांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सहभागी करण्यासाठीच या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, कार्यक्रमाला की-बोर्डवर संगीत साथ अभिषेक माने, मिथिलेश केसरे, बाळकृष्ण नाईक, ऑक्टोपॅडवर वेंगुर्लेचा अश्विन जाधव, ढोलकी, तबला-गौरव पिंगुळकर यांनी साथ दिली. सचिन मदने यांनी सूत्रसंचालन केले. तहसीलदार पाठक यांनी आभार मानले. तहसीलदार पाठक यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम पार पडला.
---
प्रेक्षक भारावले
कुडाळ ठाण्यातील पोलिस योगिता राणे यांनी ‘तेरे मिट्टी मे मर जावा’ गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. श्वेता नाईक यांनी ‘ऐ मेरे वतन के लोगो’, अभिषेक माने, प्रणय तेली, डॉ. संजीव आकेरकर, डॉ. संजय केसरे, डॉ. संजय सावंत, रोटरी क्लब अध्यक्ष अमित वळंजू आदींनी गाणी सादर केली. छोट्यांमध्ये ऋषिकेश तेली, वेदांत वळंजू, स्वरा नाईक यांनीही उपस्थितांची दाद मिळवली. कवठीचे ग्रामसेवक सतीश साळगावकर यांनी ‘शूर आम्ही सरदार’, तर कुडाळ नगरपंचायत कर्मचारी पेडणेकर यांनी ‘विठ्ठला तू वेडा कुंभार’ ही गीते सादर केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87379 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..