स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव ठरला यादगार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव ठरला यादगार
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव ठरला यादगार

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव ठरला यादगार

sakal_logo
By

43407
कुडाळ ः पंचायत समितीच्या प्रांगणात ध्वजवंदनावेळी मान्यवर.


स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव यादगार

शहिदांनाही मानवंदना; कुडाळ पंचायत समितीच्या उपक्रमांना प्रतिसाद

कुडाळ, ता. १६ ः स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव तालुक्यात विविध कार्यक्रमांनी संस्मरणीय ठरला. देशासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिवीर, शहिदांना मानवंदना देण्यात आली. देशाभिमान जागृत करणारी समरगीते, देशभक्ती गीतांनी अमृतमहोत्सव यादगार ठरला. दौड स्पर्धा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव रॅलीतून ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’चा जयघोष करण्यात आला. विविध गीतांतून देशभावना जागविण्यात आल्या.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त कुडाळ तालुक्यात गेले नऊ दिवस कुडाळ पंचायत समितीच्या वतीने कृषी मेळावे, क्रांतिवीर, शहिदांच्या आठवणींना उजाळा, समरगीत, सांस्कृतिक स्पर्धा, आरोग्य उपक्रम, वृक्षारोपण, ऐतिहासिक स्थळांना भेटी, स्वच्छता अभियान आदी विविध कार्यक्रम पार पडले. १५ ला स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव विविध उपक्रमांनी साजरा केला. पंचायत समितीच्या प्रांगणात प्रशासक तथा गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी ध्वजारोहण केले. यावेळी जिल्हा परिषद कन्याशाळा कुडाळच्या शिक्षिका विनयश्री पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर स्फूर्तिगीते सादर करून सोहळा अधिक रंगतदार केला. सहायक गटविकास अधिकारी बाळकृष्ण परब, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी गीता पाटकर-पई, गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर, पीएमजीएसचे श्री. माळगावकर, उपअभियंता (जलसंधारण) लक्ष्मण डुबळे, तालुका वैदयकीय अधिकारी संदेश कांबळे, कृषी अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, विस्तार अधिकारी महादेव खरात, दत्ताराम आंबेरकर, रामचंद्र जंगले, संजय ओरोसकर, कक्ष अधिकारी मृणाल कार्लेकर, लेखाधिकारी दगडू वडर, रवी पोवार, पूजा पिंगुळकर आदी उपस्थित होते.
येथील तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणात प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांनी ध्वजारोहण केले. तहसीलदार अमोल पाठक आदी उपस्थित होते. तर नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष आफ्रिन करोल यांनी, गांधीचौक येथे उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट यांनी ध्वजारोहण केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन गाढवे आदी उपस्थित होते. कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन येथे पहिल्या तृतीयपंथी प्राथमिक शिक्षिका रिया आळवेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
...........
चौकट
सर्वांच्या सहकार्याने महोत्सव यशस्वी
जिल्ह्यात देशाभिमान जागृत करणारे विविध नावीन्यपूर्ण कार्यक्रम कुडाळ तालुक्याने घेतल्याने सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हा उपक्रम सर्वांच्या सहकार्याने यशस्वी झाला. प्रत्येकामध्ये देशाभिमान जागृत झाला पाहिजे. क्रांतिकारक, स्वातंत्र्यसेनानी, शहिदांच्या त्यागामुळेच गेली पंच्याहत्तर वर्षे आपण स्वातंत्र्य उपभोगीत आहोत, असे गटविकास अधिकारी चव्हाण सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87381 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..