तळेरे महाविद्यालयात ध्वजारोहण उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळेरे महाविद्यालयात ध्वजारोहण उत्साहात
तळेरे महाविद्यालयात ध्वजारोहण उत्साहात

तळेरे महाविद्यालयात ध्वजारोहण उत्साहात

sakal_logo
By

४३४२१
तळेरे ः महाडीक महाविद्यालयात विविध स्पर्धांतील विजेत्यांना गौरविताना मान्यवर. (छायाचित्र ः एन. पावसकर)

तळेरे महाविद्यालयात
ध्वजारोहण उत्साहात
तळेरे ः येथील वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष उत्साहात साजरे करण्यात आले. शाळा समिती सदस्य प्रवीण वरुणकर यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शाळा समिती चेअरमन अरविंद महाडीक, शरद वायंगणकर, तळेरे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजू जठार, प्रा. अविनाश मांजरेकर, शिक्षक-पालक संघ उपाध्यक्ष संतोष पाटणकर, माईंड ट्रेनर सदाशिव पांचाळ, ज्येष्ठ शिक्षक सी. व्ही. काटे, आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. एनसीसी विभागप्रमुख एन. बी. तडवी, तर स्काऊट-गाईड प्रमुख डी. सी. तळेकर, पी. एन. काणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम झाले. राष्ट्रगीत, झेंडागीत, देशभक्तीपर समूहगीते सादर करण्यात आली. वक्तृत्व, निबंध, चित्रकला, पाढे पाठांतर, समूहगायन अशा विविध स्पर्धांमधील विजेत्यांना गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या वेशभूषानीं सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ए. बी. कानकेकर यांनी, आभार सी. व्ही. काटे यांनी मानले.
--
४३४२०
तळेरे ः माजी विद्यार्थ्यांकडून विद्यालयाला भेट दिलेल्या राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा.

राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांची भेट
तळेरे ः स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवीवर्षाचे औचित्य साधत माजी विद्यार्थ्यांकडून तळेरे येथील वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाला राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा भेट म्हणून देण्यात आल्या. माजी विद्यार्थी स्वप्नील कल्याणकर, निखिल जमदाडे, सूरज बिद्रे, सचिन वाडेकर यांच्याकडून राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा देण्यात आल्या. तसेच सागर डंबे, मिथिल डंबे यांनी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप दिले. चेअरमन अरविंद महाडीक, शाळा समिती सदस्य प्रवीण वरुणकर, शरद वायंगणकर, तळेरे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजू जठार, प्रा. अविनाश मांजरेकर, शिक्षक-पालक संघाचे उपाध्यक्ष संतोष पाटणकर, माईंड ट्रेनर सदाशिव पांचाळ, अनुष्का नर, चव्हाण, ज्येष्ठ शिक्षक सी. व्ही. काटे, ए. बी. कानकेकर, पी. एन. काणेकर, डी. सी. तळेकर, पी. एम. पाटील, एन. बी. तडवी, व्ही. डी. टाकळे, ए. बी. तांबे, एस. एन. जाधव, एस. यू. सुर्वे, एन. पी. गावठे, ए. पी. कोकरे, समीर चव्हाण, अंकित घाडीगावकर, लिपीक राजेश तांबे, कल्पेश तळेकर, प्रकाश घाडी, देवेंद्र तळेकर, संदेश तळेकर आदी उपस्थित होते. प्रा. मांजरेकर यांनी आभार मानले.
--
४३३९५
मालवण ः विश्व हिंदू परिषदेच्यावतीने शहरात काढलेली तिरंगा रॅली.

मालवणात तिरंगा रॅली
मालवण ः स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त शहरात विश्व हिंदू परिषदेच्यावतीने तिरंगा रॅली काढली. मालवणवासीय यात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. एसटी बसस्थानकापासून सुरू झालेली रॅली बाजारपेठ, फोवकांडा पिंपळ, भरड मार्गे कुंभारमाठ अशी काढण्यात आली. हुतात्मा प्रभाकर रेगे स्मारकाजवळ सांगता झाली. राष्ट्र प्रेमी नागरिक तिरंगा रॅली मध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. सर्वांचे विश्व हिंदू परिषद मालवणच्यावतीने आभार मानण्यात आले.
--
43403
तळेरे ः रॅलीत सहभागी फणसगाव महाविद्यालयाचे विद्यार्थी.

फणसगाव महाविद्यालयातर्फे पथनाट्य
तळेरे ः देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ‘तिरंग्याचे महत्त्व’ हे पथनाट्य देवगड तालुक्यातील फणसगाव कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर करून जनजागृती केली. प्राचार्य सौ. अनुश्री नारकर, एनएसएस विभाग प्रमुख सौ. जानवी नारकर, महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. या पथनाट्याचे लेखन दिग्दर्शन आणि संचालन प्रा. केतकी पारकर यांनी केले. गावातील ग्रामस्थांनी कार्यक्रमासाठी प्राचार्य नारकर तसेच सहाय्यक आणि विद्यार्थी यांचे आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87384 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..