महिलांनी स्वयंपूर्ण बनणे गरजेचे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिलांनी स्वयंपूर्ण
बनणे गरजेचे
महिलांनी स्वयंपूर्ण बनणे गरजेचे

महिलांनी स्वयंपूर्ण बनणे गरजेचे

sakal_logo
By

L43419

ओळ - नेरुर ः येथे महिला मेळाव्याला उस्फुर्त प्रतिसाद लाभला. (छायाचित्र ः अजय सावंत)

महिलांनी स्वयंपूर्ण
बनणे गरजेचे
समृद्धी मुळेकर ः नेरुरमध्ये महिला मेळावा
कुडाळ, ता. १६ः स्पर्धात्मक युगात वाटचाल करताना आजची स्त्री अजूनही सुरक्षित नाही. त्यांचे सबलीकरण झाले पाहिजे. भविष्यात महिलांना स्वयंपूर्ण बनविणे काळाची गरज आहे. स्वतःच्या स्वसंरक्षणासाठी त्यांना कराटेसह अन्य प्रशिक्षण दिले पाहिजे, असे प्रतिपादन महिला समुपदेशक समृद्धी मुळेकर यांनी नेरूर येथे महिला मेळाव्यात केले.
महिला व बालविकास अनुदानित महिला मंडळ, कुडाळ संचलित महिला व बालकांवरील अत्याचाराला प्रतिबंध करण्यासाठी महिला व बालकांकरिता विशेष सहायता कक्ष कायदेविषयक मार्गदर्शन अंतर्गत महिला मेळाव्याचे आयोजन उमेदच्यावतीने संगम प्रभाग संघ नेरूर आणि नेरूर, कवठी, चेंदवण, वालावल, हुमरमळा, सरंबळ या पंचक्रोशीतील ग्रामसंघाच्या सीआरपी यांच्या सहकार्याने नेरूर ग्रामपंचायत सभागृहात केले होते. यावेळी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया नेरूर अधिकारी अविनाश करंबे, महेंद्र जाधव, संगम प्रभाग संघाच्या अध्यक्ष सोनाली चव्हाण, सचिव स्वरा नेरुरकर, लेखापाल स्नेहा गावडे, कोषाध्यक्ष पुष्पलता म्हाडदळकर, गौरी आईर, प्राजक्ता नाईक, रश्मी भाईत, पंचक्रोशीतील सीआरपी व ग्रामसंघ पदाधिकारी महिला आदी उपस्थित होत्या. श्रीमती मुळेकर यांनी महिलांवर होणारे अत्याचार व मुलाचे अधिकार संरक्षण कसे करावे, याबाबत मार्गदर्शन केले तर गौरी आईर व रश्मी भाईत यांनी भविष्यात मोबाईलमुळे शैक्षणिक गुणवत्तेवर दृष्पपरिणाम, फायदे, तोटे यांची माहिती देऊन मोबाईलच्या शैक्षणिक व योग्य त्या गोष्टींसाठीच वापर करण्याचा सल्ला दिला. प्राजक्ता नाईक यांनी प्रभाग संघ बळकटबाबत मार्गदर्शन केले. श्री. करंबे यांनी आर्थिक साक्षरताबाबत बहुमोल मार्गदर्शन केले.
...............

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87385 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..