फोटोसंक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटोसंक्षिप्त
फोटोसंक्षिप्त

फोटोसंक्षिप्त

sakal_logo
By

43422
मालवण ः सिंधुदुर्ग महाविद्यालयात घेण्यात आलेल्या नारळ लढविणे स्पर्धेतील विजेत्या सोबत प्राध्यापक वर्ग.

नारळ लढविणे स्पर्धेत
अमित बोर्डवेकर प्रथम
मालवण, ता. १६ ः येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयामध्ये नारळी पौर्णिमेनिमित्त कॉलेजमधील युवक युवतींची नारळ लढविणे स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये तृतीय वर्ष वाणिज्य शाखेच्या अमित बोर्डवेकर याने प्रथम क्रमांक पटकावला तर मुलींमध्ये तृतीय वर्ष बीएस्सी शाखेच्या मॅक्सिना फर्नांडिस हिने प्रथम क्रमांक पटकाविला.
प्राचार्या डॉ. उज्वला सामंत व प्रा. अन्वेशा कदम यांनी नारळ लढवून स्पर्धेला प्रारंभ केला. स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्रथम वर्ष कला शाखेच्या तुषार घाडीगावकर याने पटकावला. स्पर्धेत मुलांमध्ये ३० तर कनिष्ठ महाविद्यालयातून १० स्पर्धक सहभागी झाले होते. यामध्ये बारावी वाणिज्य शाखेच्या सौरभ साळकर याने प्रथम क्रमांक पटकावला. यावेळी प्राचार्या डॉ. उज्वला सामंत, प्रा. बी. एच. चौगुले, प्रा. डॉ. सुमेधा नाईक, प्रा. एम. आर. खोत, प्रा. हसन खान, प्रा. कैलास राबते, प्रा. एच. एम. चौगले व इतर उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून प्रा. संकेत बेळेकर, प्रा. डी. व्ही. हारगिले यांनी काम पाहिले. स्पर्धेचे बक्षीस वितरण कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये करण्यात येणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87386 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..