ग्रंथालयांचे संवर्धन गरजेचे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रंथालयांचे संवर्धन गरजेचे
ग्रंथालयांचे संवर्धन गरजेचे

ग्रंथालयांचे संवर्धन गरजेचे

sakal_logo
By

L43394

ओळ - सुकळवाड ः एमआयटीएम कॉलेज येथे ग्रंथपाल दिनानिमित्त उपस्थित मान्यवर.

ग्रंथालयांचे संवर्धन गरजेचे
पूनम कदम ः सुकळवाड ग्रंथपाल दिन उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १६ ः ग्रंथालयांच्या विकासात डॉ. एस. आर. रंगनाथन यांचा सिंहाचा वाटा आहे. ग्रंथालय ही एक सामाजिक संस्था असून समाजाच्या हितासाठी ग्रंथालयांचे संवर्धन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेजच्या डीन एकेडमिक पूनम कदम यांनी सुकळवाड येथे केले.
ग्रंथालयाचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त सुकळवाड येथील जयवंती बाबू फाउंडेशन मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (एमआयटीएम) कॉलेजमध्ये राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला. ज्येष्ठ शिक्षक विशाल कुशे यांच्या हस्ते डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला. यावेळी मनोज खाडीलकर, सुकन्या सावंत, श्री. कुर्से, ग्रंथपाल अपर्णा मांजरेकर यांच्यासह महाविद्यालयाचे अन्य प्राध्यापक आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते. सौ. कदम म्हणाल्या, "शिक्षण मिळविणे सोपे आहे, पण शिक्षण देणे हे एक शास्त्र आहे, हे लक्षात आल्यानंतर डॉ. रंगनाथन यांनी त्या शास्त्राचा अभ्यास करण्याचे ठरवून अध्यापन शास्त्राची ‘एल. टी.’परीक्षा उत्तीर्ण केली आणि गणिताचे प्राध्यापक झाले. नंतर त्यांनी आपली प्राध्यापकाची नोकरी सोडून भारताचे पहिले ग्रंथपाल पद स्वीकारले. त्यांनी मद्रास विद्यापीठात ग्रंथपाल म्हणून काम पाहिले. ग्रंथालय शास्त्राच्या शिक्षणाकरिता मद्रास विद्यापीठाने आपल्या स्वखर्चाने त्यांना स्कूल ऑफ लायब्ररीयनशिप साठी लंडनला पाठविले होते. लंडन विद्यापीठाचा एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करून ते पुन्हा मायदेशी परतले. सार्वजनिक ग्रंथालयाची गरज ओळखून ३० जानेवारी १९२४ ला त्यांनी ''मद्रास ग्रंथालय संघाची'' स्थापना केली." ग्रंथपाल अपर्णा मांजरेकर यांनी प्रास्ताविक करताना डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या बाबत सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन तेजस म्हापसेकर यांनी केले. ग्रंथालय कर्मचारी सायली पाटकर यांनी आभार मानले.
-------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87387 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..