कळसुलकर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यसेनानींचे स्मरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कळसुलकर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यसेनानींचे स्मरण
कळसुलकर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यसेनानींचे स्मरण

कळसुलकर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यसेनानींचे स्मरण

sakal_logo
By

कळसुलकर कॉलेजमध्ये
स्वातंत्र्यसेनानींचे स्मरण
सावंतवाडी, ता. १६ ः स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत जनतेच्या तसेच विद्यार्थ्यांच्या मनात स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतिकारक, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, देशभक्तीची भावना कायमस्वरुपी जनमानसात राहावी, या उद्देशाने कळसुलकर कॉलेजमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. उत्तम पाटील यांनी परिचय केला. यावेळी माजी सैनिक सचिन सावंत यांनी सैन्यदलात नाईक पदावर कार्यरत असताना चित्तथरारक प्रसंग, अनुभव, धाडस, चिकाटी, धैर्य, शिस्त, एकता, संयम आणि अनुशासन याविषयी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना स्वानुभवातून धडे दिले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन सुसंवाद साधला. याचबरोबर ‘अग्नीवीर’ या केंद्राच्या नवीन योजनेत सामील होण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले. प्राचार्य मानकर यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता विद्यार्थिनींनी भारतमातेच्या गुणगौरव गीतातून केली. यासाठी परब मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमास सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शैलेश पई तसेच सदस्य टिपणीस मॅडम यांनी शुभेच्छा दिल्या. प्रसाद कोलगावकर यांनी आभार मानले.
.............
आंबेगावात विद्यार्थ्यांना
सर्पजगताचे मार्गदर्शन
सावंतवाडी, ता. १६ ः आंबेगाव शाळा नं. १ येथे ‘ओळख सर्पजगताची’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना बालवयातच सर्पजगताची ओळख व्हावी, त्यांच्यामध्ये सर्पसंवर्धनाची दृष्टी निर्माण व्हावी, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला. शाळेच्या स्काऊट व गाईड पथकाने कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. आरोग्यवर्धिनी केंद्र कुणकेरीच्या आरोग्य अधिकारी डॉ. श्रद्धा कासार यांनी विद्यार्थ्यांना सर्पजगताची ओळख, विविध सापांची गुणवैशिष्ट्ये, सर्पदंशावरील प्रथमोपचार, घ्यावयाची काळजी, सापांचे निसर्गातील महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. चित्ररुपात तसेच व्हिडिओच्या माध्यमातून सापांच्या विविध प्रजातींचा विद्यार्थ्यांना परिचय करून दिला. आरोग्यसेवक एस. ए. म्हापसेकर यांनीही परिसरात आढळणाऱ्या विविध सापांच्या प्रजातींविषयी मार्गदर्शन केले. यावेळी कोलगाव केंद्राचे केंद्रप्रमुख म. ल. देसाई तसेच प्रशालेच्या उच्चश्रेणी मुख्याध्यापिका अस्मिता मुननकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. उपशिक्षिका स्नेहल जगदाळे उपस्थित होत्या. शाळेचे स्काऊट मास्टर नितीन सावंत यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. विज्ञान व परिसर अभ्यास या विषयांशी सांगड घालत जीवनशिक्षणाचा धडा विद्यार्थ्यांनी गिरविला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87388 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..