विधवांच्या हस्ते ध्वजवंदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विधवांच्या हस्ते ध्वजवंदन
विधवांच्या हस्ते ध्वजवंदन

विधवांच्या हस्ते ध्वजवंदन

sakal_logo
By

43400
मांगवली ः येथे ध्वजवंदन करताना मान्यवर.

वैभववाडी, मांगवली येथे
विधवांच्या हस्ते ध्वजवंदन
वैभववाडी ः विधवा प्रथा निमुर्लन होण्यासाठी सध्या गावागावांत विविध उपक्रम राबविले जात असून रविवारी (ता.१४) पंचायत समिती आणि मांगवली ग्रामपंचायतीने विधवा महिलेच्या हस्ते ध्वजवंदन करून एक कौतुकास्पद पाऊल टाकले. या स्तुत्य निर्णयाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. विधवा अनिष्ट प्रथांचे निर्मुलन होण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यातील अनेक गावांनी यापूर्वी विधवा प्रथांना तिलांजलीचा निर्णय घेतला आहे. समाजात असलेल्या अनिष्ट प्रथा नाहीशा व्हाव्यात, यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. मांगवली ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत आणि शाळा या दन्ही ठिकाणी विधवांच्या हस्ते ध्वजवंदन करीत इतर गावांसमोर कौतुकास्पद पायंडा घातला आहे. याशिवाय पंचायत समितीनेही विधवा महिलेच्या हस्ते ध्वजवंदन केले.
----------------
43401
देवगड ः येथील पंचायत समितीच्यावतीने देवगड ते किल्ले विजयदुर्ग अशी दुचाकी फेरी काढण्यात आली होती. यामध्ये प्रभारी गटविकास अधिकारी अरूण चव्हाण यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87390 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..