आसोलीतील पुलाला भगदाड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आसोलीतील पुलाला भगदाड
आसोलीतील पुलाला भगदाड

आसोलीतील पुलाला भगदाड

sakal_logo
By

L43417

ओळ - आसोली ः येथील हायस्कूलसमोरील पुलाला पडलेले भगदाड.

आसोलीतील पुलाला भगदाड
प्रशासनाचे दुर्लक्ष ः ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १६ ः आसोली हायस्कूलसमोरील पुलाला भले मोठे भगदाड पडल्यामुळे हा मार्ग धोकादायक बनला आहे. या पुलावरून शालेय विद्यार्थ्यांची ये-जा असते; मात्र याकडे स्थानिक आजी-माजी लोकप्रतिनिधींनीसह प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने या ठिकाणी एखादा अनर्थ घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल येथील ग्रामस्थ आत्माराम घाडी यांनी उपस्थित केला आहे. या पुलाची उंची वाढविण्याचे काम तत्काळ हाती घ्यावे; अन्यथा संबंधित प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
मुसळधार पावसात या पुलावरून पाण्याचा प्रवाह वाहतो. परिसरातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांना येथूनच जावे लागते. अशातच पूरपरिस्थिती निर्माण झाल्यावर दुसरा पर्यायी मार्ग नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुससान होते. दुरुस्तीअभावी हा पूल दिवसेंदिवस जीर्ण बनत चालला असून याकडे कोणाचेही लक्ष नाही. बऱ्याच वेळा डागडुजीच्या नावाखाली केवळ मलमपट्टी केली जाते. त्यामुळे मुसळधार पावसानंतर परिस्थिती ''जैसे थे'' होते. सद्यस्थितीत पुलाला मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे ते पूल कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. संबंधित पूल गावाच्या मध्यभागी असून पूरपरिस्थिती दरम्यान संपर्क तुटतो. तर दुसरीकडे गावातील मध्यामिक आणि प्राथमिक विद्यालयातील विदयार्थ्यांना याच पुलावरून जावे लागते. पुलाची उंची वाढविण्याची मागणी गेली अनेक वर्षे ग्रामस्थांकडून होत असूनही त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. सद्यस्थितीती पडलेल्या भगदाडामुळे येथून वाहतूक करणे धोकादायक बनले आहे. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले असून, तत्काळ योग्य ती कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा श्री. घाडी यांनी दिला आहे.
................

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87391 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..