निबंध स्पर्धेत समिधा प्रथम, मधुरा द्वितीय, भाग्या तृतीय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निबंध स्पर्धेत समिधा प्रथम, मधुरा द्वितीय, भाग्या तृतीय
निबंध स्पर्धेत समिधा प्रथम, मधुरा द्वितीय, भाग्या तृतीय

निबंध स्पर्धेत समिधा प्रथम, मधुरा द्वितीय, भाग्या तृतीय

sakal_logo
By

43466
कणकवली : येथील कार्यक्रमात निबंध स्पर्धेतील विजेत्‍यांना गौरविताना मान्यवर.

निबंध स्पर्धेत समिधा प्रथम,
मधुरा द्वितीय, भाग्या तृतीय
कणकवली : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवीवर्षानिमित्त कणकवली नगरवाचनालयातर्फे निबंध स्पर्धा घेण्यात आली. यात समिधा सुभाष गावकर हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला. मधुरा शंकर राणे हिने द्वितीय तर भाग्या विनायक फणसळकर तृतीय क्रमांक प्राप्त केला. श्रद्धा सदाशिव पाटील हिला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. या स्पर्धेत ४५ स्पर्धक सहभागी झाले. निबंध स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रम प्रसंगी वाचनालयाचे हनीफ पिरखान, सहकार्यवाह डी. पी. तानवडे, नगरसेविका मेघा गांगण, प्रतीक्षा सावंत, मेघा सावंत, उर्मी जाधव, वाचनालयाच्या कार्यकारिणीचे सदस्य रवींद्र मुसळे, कल्पना सावंत, प्रकाश कामत, विलास ठाकूर, राजन ठाकूर, स्नेहल चव्हाण, बचतगटातील महिला उपस्थित होत्या. ही स्पर्धा मराठी व इंग्रजी माध्यमातून घेण्यात आली होती. विलास ठाकूर, वैभवी हरमलकर यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87419 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..