सुट्टीला जोडून संकष्टीमुळे गणपतीपुळे गजबजले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुट्टीला जोडून संकष्टीमुळे गणपतीपुळे गजबजले
सुट्टीला जोडून संकष्टीमुळे गणपतीपुळे गजबजले

सुट्टीला जोडून संकष्टीमुळे गणपतीपुळे गजबजले

sakal_logo
By

- rat१६p१५.jpg
43460
- रत्नागिरी ः गणपतीपुळे किनार्‍यावरील पर्यटकांची गर्दी.
......
- rat१६p१६.jpg
43461
- रत्नागिरी ः तिरंग्याची सजावट असलेली श्री गणपतीची पालखी. (छाया ः हर्षल कुळकर्णी, रत्नागिरी)
......
सुट्टी आली जोडून गणपतीपुळे गेले गजबजून

संकष्टीमुळे गर्दी; आले १२ हजार पर्यटक, श्रीच्या पालखीला तिरंग्याची सजावट
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ ः उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर पर्यटन हंगामही संपूष्टात आला होता. त्यामुळे पर्यटनस्थळंही सुनीसुनी होती. अधूनमधून शनिवार, रविवारी पर्यटकांची पावले वळत होती, परंतु तितकीशी गर्दी नव्हती. १५ ऑगस्टला रविवारची सुट्टी जोडून आल्यामुळे कोकणातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांचा राबता वाढलेला होता. गणपतीपुळे पर्यटन स्थळांवर सोमवारी दिवसभरात दहा ते बारा हजार पर्यटकांनी हजेरी लावली होती. सुट्टीलाच संकष्टी चतुर्थी असल्यामुळे दर्शनासाठी आलेल्या भक्तांची गर्दी अधिक होती.
गेली दोन वर्षे कोरोनाने सर्वच व्यावसायांना मोठा फटका बसलेला होता. त्यानंतर गतवर्षी दिवाळी, यंदाचा मे महिना हे हंगाम पर्यटन व्यावसायिकांसाठी समाधानकारक गेले होते. जुन महिन्यात शैक्षणिक सत्र सुुरु झाल्यामुळे सुट्ट्याही संपल्या होत्या. १५ ऑगस्टच्या आदल्या दिवशी जोडून रविवार असल्यामुळे शासकीय सुट्टीचा फायदा पर्यटकांना मिळाला. अनेकांनी फिरण्यासाठी किनारी भागातील पर्यटन स्थळांची निवड केली होती. पर्यटकांचा राबता महाबळेश्‍वर पाठोपाठच रत्नागिरीतील प्रसिध्द गणपतीपुळे किनाऱ्‍यावर अधिक होता. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची निवासस्थानांमध्येही पर्यटकांची गर्दी होती. मुंबई, पुण्यातील लोकांचा राबता अधिक होता. जून महिन्यानंतर पर्यटकांची गर्दी कमी झाल्यामुळे व्यावसायिकांची निराशा झाली होत. सोमवारी पर्यटक वाढल्यामुळे किनाऱ्‍यावरील उंट, घोडे यांच्यासह वाळूमध्ये चालवल्या जाणाऱ्‍या गाड्या चालक यांचा फायदा झाला. नारळ विक्रेत्यांसह अन्य फेरीवालेही पर्यटकांच्या गर्दीमुळे समाधानी होते. गणपतीपुळेत चारचाकी वाहनांची रेलचेल होती.
---
चौकट
पालखीला तिरंग्याची सजावट
आझादी का अमृत महोत्सव संपूर्ण देशभर साजरा केला जात असतानाच १५ ऑगस्टला संकष्टी चतुर्थी असल्यामुळे गणपतीपुळे देवस्थाननेही पालखीला तिरंग्याचे स्वरुप दिले होते. पालखीची सजावटी तिरंग्याप्रमाणेच केली होती. शेकडो भक्तांच्या उपस्थितीमध्ये सायंकाळी चार वाजता गणपतीची पालखी प्रदक्षिणेसाठी बाहेर काढण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87428 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..