साडवली-राजकीय धारणापलीकडे राष्ट्रकार्यात आम्ही एक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साडवली-राजकीय धारणापलीकडे राष्ट्रकार्यात आम्ही एक
साडवली-राजकीय धारणापलीकडे राष्ट्रकार्यात आम्ही एक

साडवली-राजकीय धारणापलीकडे राष्ट्रकार्यात आम्ही एक

sakal_logo
By

राष्ट्रकार्यात एकतेची भावना झाली वृध्दिंगत

भाजप नेते पटेल; मंतरलेल्या या दिवसांचे श्रेय नागरिकांना
साडवली, ता. १७ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनावरून पूर्ण एक वर्ष आपण सर्व लोक जमेल, तसे योगदान देत आहे. या सर्व गोष्टींचा मला एक सुजाण भारतीय नागरिक म्हणून मनस्वी अभिमान वाटतो. मागील दोन दिवस प्रत्येक भारतीय मनाच्या घरी, दुकानांत, कार्यालयात तिरंगा फडकावून ध्वजास मानवंदना दिली जात आहे. यामुळे एकंदरीत राजकीय धारणा काहीही असल्या तरी राष्ट्रकार्यात आम्ही एक आहोत, ही एकतेची भावना दिसून आली, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्ष, रत्नागिरी (द.) चे युवा मोर्चा कोषाध्यक्ष सतीश पटेल यांनी दिली.
धर्म-जाती-प्रांत-भाषा हे भेद असले तरी आमचा देश एक आहे, आमचा ध्वज एक आहे, आम्ही सर्व भारतमातेची लेकरं आहोत आणि या नात्याने शालेय प्रतिज्ञेतील सारे भारतीय माझे बांधव आहेत अनुभवत आहे. खरच हे अतिशय मंतरलेले दिवस आहेत. याचे श्रेय सर्व भारतीय नागरिकांना जाते. ही एकी चिरंतन काळासाठी टिकावी याचसाठी आपण स्वातंत्र्याचा ७६ वा वर्धापनदिन साजरा करणार आहोत.
...
चौकट
..तरच देश सक्षम
देशाला एक द्रष्टा नेता मिळाला तर काय होऊ शकते, याचा आदर्श वस्तुपाठ मोदींनी घालून दिला आहे. त्यामुळे येणार काळ निश्चित भारताचा असणार यात शंका नाही. देशातील गरिबीचे प्रमाण काही अंशी घटत चालले आहे. नागरिक सक्षम झाले तरच देश सक्षम होणार. त्यामुळे आता पुढील काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची वाटचाल समृद्धीच्या दिशेने असणार हे मात्र नक्की, असेही पटेल म्हणाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87436 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..