कोलगाव गोदामप्रकरणी उपोषण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोलगाव गोदामप्रकरणी उपोषण
कोलगाव गोदामप्रकरणी उपोषण

कोलगाव गोदामप्रकरणी उपोषण

sakal_logo
By

43495
सावंतवाडी ः उपोषणकर्ते बावतीस फर्नांडिस यांच्याशी चर्चा करताना प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर. सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे यावेळी प्रवीण भोसले, अर्चना घारे-परब, पुंडलिक दळवी आदी.

कोलगाव गोदामप्रकरणी उपोषण

राष्ट्रवादी आक्रमक; कोट्यवधी रुपये खर्चूनही पायाभूत सुविधांचा अभाव

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १६ ः कोट्यवधी रुपये खर्च करून कोलगाव येथे उभारण्यात आलेल्या शासकीय गोदाम उभारणी आणि पायाभूत सुविधांचा अभावा विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने पुकारलेल्या लाक्षणिक उपोषणाला बसलेल्या बावतीस फर्नांडिस यांना पाठिंबा देण्यासाठी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले हेही उपोषणाला बसल्यामुळे चर्चेचा विषय ठरला. याविषयी चौकशी करून कारवाई करावी असे पत्र महसूल व बांधकाम विभागाला पाठविण्यात येईल, अशी ग्वाही प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांनी दिली. तसेच उपअभियंता अनिल आवटी यांनी तसे निर्देश दिले.
कोलगाव येथे शासनाचे कोट्यावधी रुपये खर्चून शासकीय गोदाम बांधण्यात आले आहे. परंतु, या या इमारतीचे बरेचसे काम अपूर्ण असून देखील त्याचे संबंधीत ठेकेदाराला एक कोटी आठ लाख पाच हजार रुपये अदा करण्यात आले. या इमारतीचे काम हे चुकीच्या पद्धतीने झाले असून ते अपुर्ण अवस्थेत आहे. धान्य गोदामाला धान्य लोड व अनलोडींग करण्यासाठी चुकीच्या पद्धतीने रॅम्प असल्यामुळे तेथे धान्याची गाडी लावणे शक्य नाही. गोदामापर्यंतचा रस्ता अरुंद असून रस्त्यावरील पुल हे लहान असल्यामुळे या पुलावरून अवजड वहाने चालविणे धोकादायक आहे. संबंधीत जागा ही शासकिय गोदामासाठी योग्य नसताना देखील संबंधीत जागा सुचविणाऱ्या अधिकारी व संबंधीत कर्मचाऱ्यांवर चौकशी करुन तहसिलदार कार्यालयाची दिशाभूल करून शासनाचा कोट्यावधी रुपयाचा निधी खर्च केल्याबद्दल त्वरीत फौजदारी गुन्हा दाखल करुन संबंधीताकडून झालेला खर्च वसूल करून योग्य ठिकाणी शासकीय धान्य गोदामाची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी करत संबंधीतावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे फर्नांडिस यांनी अमृतमहोत्सवी स्वातंत्रदिनी सावंतवाडी उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण छेडल होते. याला माजी राज्यमंत्री भोसले, कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी पाठिंबा दिला.
--
चौकट
प्रांताधिकाऱ्यांकडून दखल
यावेळी संबंधितांवर तातडीने करवाई व्हावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला. यानंतर प्रांताधिकारी पानवेकर यांनी उपोषणकर्त्यांची उपअभियंता आवटींसोबत भेट घेतली. यावेळी कार्यकारी अभियंता यांना त्वरीत कारवाई करण्याचे आदेश प्रांताधिकाऱ्यांनी दिले. यानंतर हे उपोषण तूर्त स्थगित केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87451 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..