स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देवगडात उत्साहात साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
देवगडात उत्साहात साजरा
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देवगडात उत्साहात साजरा

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देवगडात उत्साहात साजरा

sakal_logo
By

L४३५०९

ओळ - देवगड ः येथील शेठ म. ग. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी मानवी स्वरूपात ७५ आकडा साकारला होता. (छायाचित्र ः वैभव केळकर)

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
देवगडात उत्साहात साजरा
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १६ ः स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव येथे विविध उपक्रमांनी साजरा झाला. विद्यार्थ्यांची प्रभात फेरी, स्वातंत्र्य काळातील व्यक्तींची वेशभूषा, ढोल ताशांसह लेझिम नृत्य तसेच विविध स्पर्धा घेण्यात आल्या. प्रशासकीय पातळीबरोबरच विविध सामाजिक संघटनांनी अनेक कार्यक्रम घेतले. पाऊस नसल्याने सर्वांच्या सोयीचे झाले होते. त्यामुळे उत्साहात अधिकच भर पडली होती.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने विविध कार्यालये, शाळांच्या इमारतींवर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रंगीत फुगे तसेच फुलांनी सजावट करण्यात आली होती. येथील तहसील कार्यालयात तहसीलदार मारूती कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांबरोबरच विविध स्तरातील मान्यवर आणि कर्मचारी उपस्थित होते. शाळा, महाविद्यालये, विविध कार्यालये, आस्थापना याठिकाणीही ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. शाळांमधून विविध उपक्रम राबवण्यात आले. जामसंडे हायस्कूलमध्ये ‘सेल्फी पॉईंट’ तयार करण्यात आला होता. तसेच लेझिमनृत्य करण्यात आले. स्वातंत्र्य काळातील साकारलेल्या विविध वेशभूषा लक्षवेधी ठरल्या. देवगड हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने मानवी स्वरूपात ७५ आकडा साकारला होता. विविध संघटनांनी स्पर्धा घेतल्या. दिवसभर उत्साही वातावरण होते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.
..............
चौकट
ग्रामीण भागात प्रतिसाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘हर घर तिरंगा’ या आवाहनानुसार देवगड जामसंडे शहरासह ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद लाभला. अनेकांनी उत्साहाने तिरंगा उभारून राष्ट्रप्रेम जागवले. गावागावात उत्साही वातावरण पहावयाला मिळाले.
.................

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87462 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..