मालवणात समरगीत गायन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालवणात समरगीत गायन उत्साहात
मालवणात समरगीत गायन उत्साहात

मालवणात समरगीत गायन उत्साहात

sakal_logo
By

४३५१४
मालवण ः समरगीत गायन स्पर्धेतील विजेत्यांना गौरविताना मान्यवर.

मालवणात समरगीत गायन
मालवण : येथील रोटरी क्लबतर्फे आयोजित आणि डॉ. लिमये हॉस्पिटल पुरस्कृत समरगीत गायन स्पर्धेत प्राथमिक गटात टोपीवाला प्राथमिक शाळा, तर माध्यमिक गटात रेकोबा हायस्कूलने प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धा दोन गटात झाली. प्राचार्य प्रा. डॉ. उज्वला सामंत यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्‌घाटन झाले. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष रतन पांगे, सचिव अभय कदम, डॉ. अजित लिमये रंजन तांबे, महादेव पाटकर, उमेश सांगोडकर, सुहास ओरसकर, संदेश पवार, महेश काळसेकर, संजय गावडे आदी उपस्थित होते. प्राथमिक गटात पाच संघ तर माध्यमिक गटात आठ संघ सहभागी झाले होते. स्पर्धेत प्राथमिक गटात भंडारी प्राथमिक शाळा, कन्या शाळा प्राथमिक यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. माध्यमिक गटात वराडकर हायस्कूल कट्टा, टोपीवाला हायस्कूल मालवण यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. ओझर हायस्कूलला प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. सर्वोत्कृष्ट वादक म्हणून रेकोबा हायस्कूलची निवड करण्यात आली. स्पर्धेत परीक्षक म्हणून संजय आठले, प्रफुल्ल रेवंडकर यांनी काम पाहिले. महादेव पाटकर यांनी सूत्रसंचालन केले.
..............
43398
साळिस्ते ः येथे राबविलेला स्वच्छता अभियान उपक्रम.

साळिस्तेत स्वच्छता अभियान
तळेरे ः स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त साळिस्ते येथे मुंबई-गोवा महामार्गावर स्वच्छता अभियान राबविले. जिल्हा परिषद शाळा साळिस्ते नं. १, साळिस्ते कांजीरवाडी, ग्रामपंचायत साळिस्ते यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी सरपंच मैथिली कांबळे, उपसरपंच शांताराम कांजीर, केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल, माजी सरपंच चंदूशेठ हरयाण, मुख्याध्यापक सत्यवान घाडीगावकर, ज्ञानेश्वर परदेशी, रवींद्र पाष्टे, संगीता वळवी, माथवी बुचडे, आशा सेविका दिया ताम्हणकर, अंगणवाडी सेविका स्वाती ताम्हणकर, समिता चव्हाण, पोलिस पाटील गोपाळ चव्हाण, मंगेश कांबळे, प्रशांत बारस्कर, नीलेश रांबाडे, आरती हरयाण, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते. मुख्याध्यापक सत्यवान घाडीगावकर, माजी शिक्षक प्रभाकर ताम्हणकर यांनी स्वच्छतेचे महत्त्व विशद केले. माजी सरपंच हरयाण, व प्रथमेश नारकर यांनी खाऊ वाटप केले. सीताराम पारधीये यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87468 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..