कणकवली : शिवसेना पदाधिकारी आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली : शिवसेना पदाधिकारी आरोप
कणकवली : शिवसेना पदाधिकारी आरोप

कणकवली : शिवसेना पदाधिकारी आरोप

sakal_logo
By

43516
नगरपंचायत इमारत

कणकवली नगरपंचायत
इमारत स्वच्छतेकडे दुर्लक्ष

शिवसेना ः संबंधितांवर कारवाईची मागणी

कणकवली, ता.१६ : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्‍सवी कार्यक्रमात सर्व शासकीय कार्यालयांची रंगरंगोटी करण्यात आली. कणकवली नगरपंचायतीच्या इमारतीवर मात्र शेवाळाचा थर, झाडे झुडपे वाढलेली, अशा अस्वच्छ स्थितीत राहिली. नगरपंचायत पदाधिकाऱ्यांनीही या प्रकाराकडे पूर्णत: दुर्लक्ष केले असून या प्रकाराला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
शिवसेनेचे नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर, रूपेश नार्वेकर, शहरप्रमुख उमेश वाळके, युवासेना शहराध्यक्ष आदित्‍य सापळे, तालुका समन्वयक तेजस राणे यांनी कणकवली प्रांताधिकारी यांना निवेदन दिले. यात म्‍हटले की, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी शासकीय पातळीवर अनेक उपक्रम राबविण्यात आले. केंद्र शासनानेही या महोत्सवानिमित्त शासकीय इमारती स्वच्छतेबाबत स्पष्ट निर्देश होते. मात्र कणकवली नगरपंचायत सत्ताधाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देणारी नगरपंचायत स्वतःच्या इमारतीकडे मात्र डोळेझाक करत आहे. त्यामुळे एक प्रकारे देशाच्या पंतप्रधान यांचा आदेश पायदळी तुडवण्याचा महापराक्रम प्रशासन व सत्ताधाऱ्यांनी केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87471 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..