पावस ः स्वराज्य पथनाट्याच्या स्त्रियांवरील अत्याचारांवर भाष्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावस ः स्वराज्य पथनाट्याच्या स्त्रियांवरील अत्याचारांवर भाष्य
पावस ः स्वराज्य पथनाट्याच्या स्त्रियांवरील अत्याचारांवर भाष्य

पावस ः स्वराज्य पथनाट्याच्या स्त्रियांवरील अत्याचारांवर भाष्य

sakal_logo
By

rat16p.jpg,
2L43770
ः पावस ः हर्चे येथील बॅ. नाथ पै विद्यालय व ज्युनि. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वराज्य या पथनाट्याच्या माध्यमातून स्त्रियांवरील अत्याचारावर भाष्य तर दुसऱ्या छायाचित्रात प्रबोधन करताना शालेय विद्यार्थी.
.......
स्वराज्य पथनाट्यातून अत्याचारांवर भाष्य

सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १७ ः भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त लांजा तालुक्यातील हर्चे येथील बॅ. नाथ पै विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी स्वराज्य पथनाट्याच्या माध्यमातून पावस परिसरात सामाजिक जनजागृती करून प्रबोधन केले. त्याला परिसरामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला.
आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी स्वराज्य या पथनाट्याच्या माध्यमातून पावस परिसरातील शिवारआंबेरे हायस्कूल जाकादेवी, बाजारपेठ, पावस विद्यामंदिर, स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर अशा सार्वजनिक ठिकाणी पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्यक्रम केले. विद्यार्थ्यांनी अमृत महोत्सवी वर्षांमध्ये व त्या पुढील काळामध्ये स्वराज्याची संकल्पना खऱ्या अर्थाने साकार करण्यासाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे हे अधोरेखित केले. स्त्री शिक्षण समाजामध्ये असलेला भ्रष्टाचार, शेतकऱ्यांच्या होत असलेल्या आत्महत्या, स्त्रियांवर होणारे अत्याचार, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व प्रवेशासाठी द्यावे लागणारे डोनेशन व त्यात होणारा भ्रष्टाचार या विषयी सादरीकरण करून समाजामध्ये जागृतीचे काम या पथनाट्याच्या माध्यमातून आगामी पिढीला दाखवून दिले. त्यातून खरे स्वराज्य प्राप्त करण्यासाठी या सर्व गोष्टीच्या माध्यमातून सर्व नागरिकांनी बोध घेऊन खऱ्या अर्थाने स्वराज्य कसे मिळवता येईल, हे दाखवून देण्यात आले. या सर्व गोष्टींचे उच्चाटन केल्यास भविष्यात खरे स्वराज्य प्राप्त होईल, असे प्रबोधन करण्यात आले.
-------------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87497 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..