मंडणगड - विद्यार्थिनींनी आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंडणगड - विद्यार्थिनींनी आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक
मंडणगड - विद्यार्थिनींनी आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक

मंडणगड - विद्यार्थिनींनी आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक

sakal_logo
By

विद्यार्थिनींनी आरोग्याकडे
लक्ष द्यावेः डॉ. शेख
मंडणगड, ता. १९ः किशोरवयीन मुलींमध्ये शारीरिक बदल होत असताना मुलींची आरोग्याची सामाजिक व मानसिक पार्श्वभूमी कशा पद्धतीची असते हे सांगताना आरोग्याबाबत विद्यार्थिनींमध्ये जाणीव निर्माण करण्याची गरज असल्याचे डॉ. तौफिक शेख यांनी सांगितले. मुलींमध्ये मासिक पाळीदरम्यान येणाऱ्या अडचणी व मानसिक दडपण नष्ट करणे गरजेचे आहे. त्याकरिता घरातील स्त्रिया, मैत्रिणी यांनी किशोरवयीन मुलींशी मनमोकळा संवाद राखणे आवश्यक आहे. समाजातील परंपरागत पूर्वग्रहदुषित दृष्टिकोन नष्ट करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात पंदेरी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत उपकेंद्र नारगोली व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयामध्ये ‘किशोरवयीन मुलींचे आरोग्य’ या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन भाई पोस्टुरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी एकात्मिक बालविकास पर्यवेक्षिका मीना जोशी यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थिनींच्या समस्येबाबत थोडक्यात माहिती सांगितली. मार्गदर्शनानंतर ७७ विद्यार्थिनींची हिमोग्लोबिन तपासणी करून घेतली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87503 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..