दापोली ः वैद्यकीय महाविद्यालय व्हावे ः बिरसा फायटर्सची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दापोली ः वैद्यकीय महाविद्यालय व्हावे ः  बिरसा फायटर्सची मागणी
दापोली ः वैद्यकीय महाविद्यालय व्हावे ः बिरसा फायटर्सची मागणी

दापोली ः वैद्यकीय महाविद्यालय व्हावे ः बिरसा फायटर्सची मागणी

sakal_logo
By

दापोलीत वैद्यकीय महाविद्यालय व्हावे

बिरसा फायटर्सची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
सकाळ वृत्तसेवा
दाभोळ, ता. १६ ः दापोलीत नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करावे, अशी मागणी सुशीलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री तानाजी सावंत व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली.
निवेदनात म्हटले आहे की, रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्याचे ठिकाण हे जिल्हा ठिकाणापासून तब्बल १५० किलोमीटर अंतरावर आहे. दापोलीपासून जिल्ह्याच्या ठिकाणी रुग्णांना उपचारासाठी गाडीने न्यायला ६ तासपेक्षा अधिक वेळ लागतो. दापोली तालुक्यापासून ३०० किलोमीटर अंतरावर कुठलेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाही. दापोली व दापोलीजवळच्या मंडणगड, खेड, गुहागर, चिपळूण अशा तालुक्यातील विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नसल्यामुळे पुणे, नाशिक, सिंधुदुर्ग अशा ५०० -६०० अंतरावर असणाऱ्या शहरात जाऊन शिक्षण घ्यावे लागते तसेच अनेक रुग्णांना मोठमोठ्या आजारांवर उपचारासाठी बाहेरगावी लांब अंतराच्या ठिकाणी जावे लागते. बऱ्याच इमर्जन्सी प्रकरणातील रुग्ण हे रुग्णालयात सुविधा नसल्यामुळे व पाहिजे, त्या उपचाराच्या सोयी नसल्यामुळे मरण पावले आहेत तसेच मोठ्या खासगी रुग्णालयातील उपचार खर्च हा सर्वसामान्य व गरिब लोकांना परवडत नाही.
...
चौकट
..तेथे पोहचण्याअगोदरच रुग्ण दगावतील
रत्नागिरी जिल्ह्याच्या ठिकाणी नुकतेच नवीन वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले असले तरी दापोली व रत्नागिरी यातील अंतर हे जास्त आहे. त्यामुळे काही रुग्ण हे तेथे पोहचण्याअगोदरच दगावतील. वाढलेली लोकसंख्या, विद्यार्थ्यांचे वैद्यकीय शिक्षण, मोठ्या आजारांच्या रुग्णांची गैरसोय, दापोली व रत्नागिरी यातील लांब अंतर इत्यादी गरज लक्षात घेऊन दापोली तालुक्यात नवीन शासकीय महाविद्यालय होणे अत्यंत आवश्यक असल्याने दापोलीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून सुरू करावेत, अशी मागणी सुशीलकुमार पावरा यांनी केली आहे.
-------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87505 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..