वैभववाडीत आज आरोग्य शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वैभववाडीत आज आरोग्य शिबिर
वैभववाडीत आज आरोग्य शिबिर

वैभववाडीत आज आरोग्य शिबिर

sakal_logo
By

वैभववाडीत आज आरोग्य शिबिर
वैभववाडी ः महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था आणि बी.के.एल. वालावलकर ट्रस्ट डेरवण यासह विविध संस्थांच्या माध्यमातून येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन उद्या (ता. १७) केले आहे. या शिबिरात विविध आजारांचे निदान करून शस्त्रक्रियेसाठीचे नियोजन करण्यात येणार आहे. महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था, बी. के. वालावलकर ट्रस्ट डेरवण, रावराणे चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज आणि रोटरी क्लब वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबर होणार आहे. सकाळी दहा ते सायकांळी तीन दरम्यान आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात शिबिर होईल. हर्निया, अल्सर, अपेंडिक्स, थायरॉईड, मूळव्याध, मूतखडा, चरबीच्या गाठी, मोतिबिंदू शस्त्रक्रिया, पित्ताशयातील खडे, कान, नाक, घसा शस्त्रक्रिया, कानाच्या पडद्याची शस्त्रक्रिया, महिलांच्या गर्भाशय आदींच्या आजारांचे निदान होणार आहे. त्यानंतर आवश्यकतेनुसार डेरवण येथे रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. रुग्णांनी मेडिकल रिपोर्ट घेऊन यावे. अधिक माहितीसाठी प्रमोद रावराणे, संजय रावराणे, सुधीर नकाशे, संतोष टक्के, प्रशांत गुळेकर, प्रवीण पेडणेकर, सागर रावराणे, विनायक रावराणे, राजेंद्र राणे यांच्याशी संपर्क साधावा.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87532 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..