रत्नागिरी ः राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दहीहंडी उत्सव 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दहीहंडी उत्सव 2022
रत्नागिरी ः राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दहीहंडी उत्सव 2022

रत्नागिरी ः राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दहीहंडी उत्सव 2022

sakal_logo
By

राष्ट्रवादी चिन्ह वापरा
...
राष्ट्रवादीतर्फे दहीहंडी उत्सवाचे आयोजन

मनू गुरव; प्रथम बक्षीस ११ हजार १११ रुपये, नृत्य अविष्कारही
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ ः कोरोनाचे नियम शिथिल झाल्यानंतर दोन वर्षाने यंदा मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव २०२२ या स्पर्धेचे आयोजन केले आहे. तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे याचे आयोजन केले आहे. सर्व नियमांचे पालन करत गोविदांच्या सुरक्षेची काळजी घेऊन शहरातील आठवडा बाजार येथ सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत ही स्पर्धा होईल. जास्तीत जास्त थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला ११ हजार १११ रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. या वेळी रत्नागिरी व मुंबईमधील नावलौकिक कलाकार द सेजल डान्स यांच्यामार्फत नृत्य अविष्कार होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे रत्नागिरी तालुका कार्याध्यक्ष मनू गुरव यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयस्तंभ येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी तालुका युवक अध्यक्ष सिद्धेश शिवलकर, संकेत कदम, मंदार नैकर आदी उपस्थित होते. ते म्हणाले, दहीहंडी उत्सव २०२२ चे हे १२ वे वर्षे आहे. सर्व सलामीवीर गोविंदा पथकांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देण्यात येईल. केंद्रीय लोकवा आयोगामधून निवड झालेले आयएसआय अधिकारी केतन पंदेरे यांचा रत्नागिरीतील सर्व नागरिकांच्यावतीने भव्यदिव्य सत्कार करणार आहे. कोरोनाच्या महामारमध्ये काम केलेल्या कोविड योद्ध्यांचादेखील सन्मान करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम आठवडा बाजार, रत्नागिरी येथे होणार असून या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त गोविंदा पथकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. कुमार शेटये, सुदेश मयेकर, बशीर मुर्तुझा, राजन सुर्वे व अभिजित उर्फ मनू गुरव यांच्या नेतृत्वाखाली ही दहीहंडी स्पर्धा घेण्यात येणार आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी सिद्धेश शिवलकर, मंदार नैकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
...
चौकट
मयेकर यांच्याकडून पारितोषिक..
प्रथम पारितोषिक रत्नागिरीचे कार्यसम्राट, माजी नगराध्यक्ष स्व. उमेश शेट्ये यांच्या स्मरणार्थ नगरसेवक पक्षप्रतोद सुदेश मयेकर यांच्याकडून रोख रक्कम ११ हजार १११ व राष्ट्रवादी चषक देण्यात येणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87542 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..