रत्नागिरी ः नाणीजमध्ये ध्वजारोहण विधवा महिलेहस्ते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः नाणीजमध्ये ध्वजारोहण विधवा महिलेहस्ते
रत्नागिरी ः नाणीजमध्ये ध्वजारोहण विधवा महिलेहस्ते

रत्नागिरी ः नाणीजमध्ये ध्वजारोहण विधवा महिलेहस्ते

sakal_logo
By

काही सुखद ...................लोगो
.................
विधवा महिलेच्या हस्ते ध्वजवंदन

नाणीजमध्ये प्रथा निर्मुलनापुढचे पाऊल; अधिकाऱ्यांचे औक्षण
रत्नागिरी, ता. १६ ः विधवा प्रथा बंदीचा ठराव नाणीज ग्रामपंचायतीने काही दिवसांपूर्वी केला होता. त्यानंतर आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत ग्रामपंचायतीमध्ये १३ ऑगस्टला ध्वजारोहण गावातील विधवा महिलेच्या हस्ते केले. त्यानंतर १४ ला माजी सैनिकांच्या हस्ते तर १५ ऑगस्टला सेवानिवृत्त पाणीवितरण कर्मचाऱ्‍याला मान देण्यात आला.
नाणीज ग्रामपंचायतीचे सरपंच गौरव दिलीप संसारे यांच्या संकल्पनेतून ध्वजारोहण कार्यक्रम तीन दिवस राबवण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हे कार्यक्रम घेण्यात आले. विधवा महिलांना समाजात मानाचे स्थान मिळावे, म्हणून श्रीमती प्रतिभा पांडुरंग रेवाळे यांच्या हस्ते १३ ला ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. नाणिज गावात विधवा अनिष्ट प्रथा निर्मूलन करण्यासाठी सरपंच गौरव संसारे यांनी विशेष मेहनत घेतली होती. विधवा महिलांना मानसन्मान देण्याचे कार्य ते करत आहेत. १५ ऑगस्टला मुख्य कार्यक्रमावेळी सरंपचांनी ध्वजारोहणाचा मान सेवानिवृत्त झालेले कर्मचारी अनंत गोविंद हतपले यांना दिला. त्यांनी नाणीज गावाच्या सेवेसाठी ३५ वर्ष अहोरात्र मेहनत घेतली होती. या माध्यमातून आगळावेगळा आदर्श घालून दिलाआहे.
...
चौकट
समाजात मानाचे स्थान मिळवून देणार
याबाबत ग्रामपंचायत सदस्य विनायक शिवगण म्हणाले, नाणीज ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव केला. या प्रथा बंद करत असतानाच विधवांना समाजात मानाचे स्थान मिळवून देणेही तेवढेच गरजेचे आहे. त्यासाठी ग्रामपचायंतीला भेट देणाऱ्‍या वरिष्ठ अधिकाऱ्‍यांचे औक्षण करून स्वागत विधवा महिलांच्या हस्ते करण्यात आले. या माध्यमातून समाजातील चालीरिती बाजूला काढण्याचा आमचा प्रयत्न आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87543 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..