रत्नागिरी ः स्वातंत्र्यदिनी चौघांचे एकदिवसीय आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः स्वातंत्र्यदिनी चौघांचे एकदिवसीय आंदोलन
रत्नागिरी ः स्वातंत्र्यदिनी चौघांचे एकदिवसीय आंदोलन

रत्नागिरी ः स्वातंत्र्यदिनी चौघांचे एकदिवसीय आंदोलन

sakal_logo
By

वर्षानंतरही रस्ता सापडत नसल्याने वेधले लक्ष

स्वातंत्र्यदिनी चौघांचे आंदोलन; अन्यायाविरोधात फोडली वाचा
रत्नागिरी, ता. १६ ः स्वातंत्र्यदिनी सोमवारी (ता. १५) रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर चौघांनी लाक्षणिक उपोषण करत आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडली. तुलनेत यंदा उपोषणकर्त्यांची संख्या कमी होती.
मयत व्यक्ती बाहेरगावी असल्याचे लेखी प्रतिज्ञापत्र देत त्या द्वारे तक्रारदारांच्या जागेसह सरकारी जागेवर बांधकाम करून सीआरझेडचे उल्लंघन करून शासनाची फसवणूक करणाऱ्‍या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी काळबादेवी येथील शैलेंद्र मयेकर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाला बसले आहेत. संगमेश्वर तालुक्यातील तळेकांटे-तुळसणी-देवरूख रस्त्याच्या ठेकेदाराने केलेल्या अनधिकृत माती उत्खनन व रस्ता दुरुस्तीसाठीच्या कामाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुकाध्यक्ष व नगरसेवक अनुराग कोचिरकर यांनी आपल्या सहकाऱ्‍यांसह उपोषण सुरू केले आहे. जिल्ह्याच्या किनारपट्टीवर होणाऱ्‍या बेकायदेशीर पर्ससीननेट मासेमारीवर करवाई करण्यासाठी रत्नागिरी तालुका शाश्वत मच्छीमार हक्क संघटनेचे पदाधिकारी उपोषणाला बसले होते. मासेमारीच्या सुधारित कायद्याची अंमलबजावणी करून पर्ससीननेट मासेमारी, एलईडी मासेमारीवर बंदी घालून त्यांच्यावर कठोर करवाई करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.
..
चौकट
अधिकाऱ्‍यांवर कारवाई करा..
रत्नागिरी तालुक्यातील जाकिमिऱ्‍या येथील जयश्री गणपत पाटील यांच्यावतीने त्यांच्या मुलाने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण केले. तालुक्याच्या गटविकास अधिकाऱ्‍यांना हातखंबा गावातील २० फुटी रस्ता सापडत नसल्याबद्दल उपोषण सुरू केले आहे. तारवेवाडी येथील रस्त्यांची नोंद ग्रामपंचायतीच्या नोंदवहीत आढळून आलेली नाही. संबंधित विभागांनी वेळेत दखल न घेतल्याने रस्ता शोधण्यासाठी एका वर्षाचा कालावधी उलटला आहे. संबंधित अधिकाऱ्‍यांवर कारवाई करण्यासाठी त्यांनी आंदोलन सुरू केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87555 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..