शिक्षणमंत्री झालो म्हणून नाराज नाही ः केसरकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षणमंत्री झालो म्हणून 
नाराज नाही ः केसरकर
शिक्षणमंत्री झालो म्हणून नाराज नाही ः केसरकर

शिक्षणमंत्री झालो म्हणून नाराज नाही ः केसरकर

sakal_logo
By

शिक्षणमंत्री झालो म्हणून
नाराज नाही ः केसरकर
शिक्षण धोरणाबाबत खबरदारी घेणार

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १६ ः शालेय शिक्षणमंत्री पद मिळाल्याने मी नाराज नाही. शिक्षण धोरण वारंवार बदलून चालणार नाही. त्यामुळे अभ्यासपूर्ण निर्णय घेतले जातील, असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

शालेय शिक्षणमंत्री पद मिळाल्याने मी नाराज असल्याबाबत बोलले जात आहे; पण मी नाराज नाही. खातेपाटप झाल्यानंतर उद्योग, पर्यटनसारख्या खात्यात विकास करण्याची ताकद आहे. शिक्षण खात्यात नाही, असे बोललो होतो. त्याचा चुकीचा अर्थ काढला गेला; पण मी नाराज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘‘सिंधुदुर्गचा पालकमंत्री कोण असणार माहीत नाही; परंतु ध्वजवंदनाचा अधिकार मला दिला. त्यामुळे मला पालकमंत्री पद मिळेल, अशी आशा आहे. पालकमंत्री कोणी असला तरी मी आठवड्यातून तीन दिवस जिल्ह्यात राहणार आहे. जिल्हा नियोजन बैठकीला सुद्धा उपस्थित राहणार आहे.’’

ते म्हणाले, ‘‘मी अजून पदभार स्वीकारलेला नाही. हा विभाग महत्त्वाचा आहे. सरकारी कर्मचाऱ्यांवर पगारासाठी होत असलेल्या खर्चाच्या ५० टक्के खर्च शिक्षकांवर होत असतो. त्यामुळे निर्णय घेताना खबरदारी घ्यावी लागणार आहे. शिक्षण व्यवस्थेत अचानक मोठे बदल करता येणार नाही. तसे केल्यास त्याचा दुष्परिणाम शिक्षण क्षेत्रावर होऊ शकतो. बदल करायचा झालाच, तर जुना निर्णय घेताना नेमका कोणता उद्देश होता, याचा अभ्यास करून गरज असलेला बदल केला पाहिजे.’’

ते म्हणाले, ‘‘जिल्ह्यात उद्योग, व्यवसाय व पर्यटनावर भर द्यावा लागणार आहे. आडाळी औद्योगिक वसाहत लवकर सुरू केली जाईल. मोठी गुंतवणूक केली, तर मोठा रोजगार मिळू शकतो. येथे प्रक्रिया करणारे उद्योग आले पाहिजेत. केंद्राने आकांक्षित जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्गचा समावेश केला आहे. यात फूड प्रोसेसिंग पर्यटन याचा सिंधुदुर्गला प्राधान्य देण्यात आले आहे. चांदा ते बांदा योजना सुरू करण्याची मागणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.’’ यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे उपस्थित होते.

जागा मिळेल तिथे ‘सी वर्ल्ड’
तोंडवळी वायंगणी येथील प्रस्तावित सी वर्ल्डबाबत केसरकर म्हणाले, ‘‘जागा मिळेल तिथे हा प्रकल्प केला जाईल. सहा महिन्यांत आरवली येथील फाईव्ह स्टार हॉटेल सुरू होईल. ताज हॉटेल पण सुरू करण्यात येणार आहे.’’

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87565 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..