रत्नागिरी ः शाश्वत मानकर ठरला राधाकृष्ण श्री 2022 चा मानकरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः शाश्वत मानकर ठरला राधाकृष्ण श्री 2022 चा मानकरी
रत्नागिरी ः शाश्वत मानकर ठरला राधाकृष्ण श्री 2022 चा मानकरी

रत्नागिरी ः शाश्वत मानकर ठरला राधाकृष्ण श्री 2022 चा मानकरी

sakal_logo
By

at१६p४०.jpg
L43580
-रत्नागिरी ः राधाकृष्ण वैश्य मंदिर संस्था आणि वैश्य युवा आयोजित राधाकृष्ण श्री २०२२ चा मानकरी शाश्वत मानकरने अशी पोझ दिली. सोबत आयोजक व अन्य मान्यवर.
-----------------
राधाकृष्ण श्रीचा शाश्वत मानकरला किताब

जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा; बेस्ट पोझर प्रणव कांबळी, मोहसीन उगवता तारा
रत्नागिरी, ता. १६ ः राधाकृष्ण वैश्य मंदिर संस्था, रत्नागिरी आणि वैश्य युवा आयोजित राधाकृष्ण श्री २०२२ चा मानकरी शाश्वत मानकर ठरला आहे तर बेस्ट पोझर म्हणून प्रणव चंदन कांबळी याचा गौरव करण्यात आला. उगवता तारा पुरस्कार मंडणगड येथील मोहसीन गफार सय्यद याला देण्यात आला.
''राधाकृष्ण श्री २०२२'' जिल्हास्तरीय बॉडीबिल्डिंग स्पर्धा १४ ऑगस्ट २०२२ ला राधाकृष्ण मंदिर येथे झाली. राधाकृष्ण वैश्य मंदिर संस्था, रत्नागिरी आणि वैश्य युवा यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या हस्ते झाले. त्या वेळी राधाकृष्ण वैश्य मंदिर संस्थेचे अध्यक्ष राजन मलुष्टे, उपाध्यक्ष विरेंद्र वणजू, सेक्रेटरी मकरंद वणजू, विश्वस्त वसंत भिंगार्डे, राजेश रेडीज, हेमंत वणजू, जान्हवी पाटील, सदानंद जोशी, सौरभ मलुष्टे उपस्थित होते. चार गटात ही स्पर्धा घेण्यात आली. पहिल्या गटात अमर लटके चिपळूण याचा प्रथम क्रमांक आला तर ओंकार कांगणे दापोली याचा दुसरा, महेश आंबेकर रत्नागिरी तृतीय, मोहित गुजर देवरूख चौथा आणि राजेंद्र मोडक याचा पाचवा क्रमांक आला. दुसऱ्या गटात शाश्वत मानकर रत्नागिरी प्रथम, हर्षद मांडवकर राजापूर दुसरा, वैभव मेस्त्री रत्नागिरी तिसरा, आकाश वाजे चिपळूण चौथा आणि रणजित भुवड चिपळूण याचा पाचवा क्रमांक आला. तिसऱ्या गटात वैभव देवरूखकर चिपळूण पहिला, संजय डेरवणकर सावर्डे दुसरा, गणेश गोसावी सावर्डे तिसरा, नितेश रसाळ खेड चौथा आणि संकेत फागे याचा पाचवा क्रमांक आला. चौथ्या गटात अजिंक्य कदम राजापूर प्रथम क्रमांक, स्वप्नील तळेकर रत्नागिरी दुसरा, सागर सपटे मंडणगड तिसरा, सुदर्शन पाटील चौथा तर सनम इंगावले खेड याचा पाचवा क्रमांक आला.
शाश्वत मानकर याने राधाकृष्ण श्री २०२२ चा किताब पटकावला. बेस्ट पोझर म्हणून प्रणव चंदन कांबळी, रत्नागिरी आणि उगवता तारा म्हणून मोहसीन गफार सय्यद -न्यू गोल्ड जिम, मंडणगड यांची निवड करण्यात आली.
...
चौकट
मानाचा पट्टा व रोख पारितोषिकही
स्पर्धेच्या बक्षीस वितरणावेळी ‘राधाकृष्ण श्री’ किताब विजेता शाश्वत मानकर याला मानाचा पट्टा व रोख पारितोषिक सुधीर वणजू व अभिज्ञ वणजू (छाया उद्योग समुह) यांच्या हस्ते देण्यात आले. आकर्षक शिल्ड ज्येष्ठ उद्योज प्रवीण मलुष्टे यांच्या हस्ते देण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87569 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..