चिपळूण ः विरेश्वर तलावात मृत माशांचा खच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः विरेश्वर तलावात मृत माशांचा खच
चिपळूण ः विरेश्वर तलावात मृत माशांचा खच

चिपळूण ः विरेश्वर तलावात मृत माशांचा खच

sakal_logo
By

rat१६p१९.jpg ः चिपळूण ःशहरातील विरेश्वर तलावात मृत माशांचा खच पडला होता.
L43469
......
विरेश्वर तलावात मृत माशांचा खच

रसायन टाकल्याचा संशय; पालिकेकडून स्वच्छता, मृत मासे काढले बाहेर
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १६ ः शहराच्या मध्यभागी असलेल्या ऐतिहासिक विरेश्वर तलावात मंगळवारी सकाळी शेकडो मृत माशांचा खच पडला होता. पाण्यावर मोठ्या प्रमाणात मृत मासे तरंगताना दिसत होते. तलावाच्या किनारी मृत माशांचा खच पडला असून यामुळे संपूर्ण तलाव परिसरात दुर्गंधी पसरली होती. तलावातील पाण्याचा रंगही बदलला होता. पालिकेच्या कर्मचाऱ्यांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तलावाची स्वच्छता केली.
विरेश्वर मंदिर परिसरात हा ऐतिहासिक तलाव आहे. तलावाच्या भोवती वॉकिंग ट्र्र्रॅक असल्यामुळे येथे सकाळ, संध्याकाळ नागरिक चालण्यासाठी येत असतात तसेच मंदिरात दररोज भाविक दर्शनासाठी येत असतात. हा तलाव पालिकेच्या अखत्यारित आहे. मंदिरानजीक हा तलाव असल्याने तिथे मासेमारी करू दिली जात नाही. अनेक भाविक तलावातील माशांना खाद्यपदार्थ टाकत असतात. त्यामुळे या तलावात मोठ्या प्रमाणात पालू जातीचे मासे आहेत. मंगळवारी पहाटे या तलावाच्या किनाऱ्यावर शेकडो मृत माशांचा खच भाविकांच्या दृष्टीस पडला. सामाजिक कार्यकर्ते नित्यानंद भागवत यांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी चिपळूण पालिकेशी संपर्क केला.
प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे, प्रमोद ठसाळे यांनी सूचना केल्यानंतर आरोग्य निरीक्षक महेश जाधव, दीपक किंजळकर, रोहन सकपाळ आदी घटनास्थळी दाखल झाले. सफाई कामगारांच्या मदतीने त्यांनी तलाव स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली. दुपारपर्यंत तलावातील मृत मासे बाहेर काढण्यात आले. हे मासे नक्की कशामुळे मेले, याचे कारण समजू शकलेले नाही. तलावातील पाण्याचा रंग बदलल्यामुळे तलावात कुणीतरी रसायन टाकले असावे, असा संशय़ व्यक्त केला जात आहे.
...
चौकट
सीसीटीव्ही फुटेज तपासा..
तलावावर सकाळपासून संध्याकाळपर्यंत नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे कुणातरी रात्रीच्या वेळी रसायन टाकले असावे, असाही संशय व्यक्त केला जात आहे. तलावाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयितांचा शोध घ्या, अशी मागणी उदय ओतारी यांनी केली. तसेच एमपीसीबीने पाण्याने नमुने तपासून हे मासे नक्की कशामुळे मेले, त्याचा शोध घ्यावा, अशी मागणी शाहनवाज शाह यांनी केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87570 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..