मळगावात बेवारस ट्रकमध्ये सापडली २३ लाखांची दारू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मळगावात बेवारस ट्रकमध्ये 
सापडली २३ लाखांची दारू
मळगावात बेवारस ट्रकमध्ये सापडली २३ लाखांची दारू

मळगावात बेवारस ट्रकमध्ये सापडली २३ लाखांची दारू

sakal_logo
By

43596
मळगाव ः येथे जप्त केलेल्या मुद्देमालासह राज्य उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी व कर्मचारी. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

मळगावात बेवारस ट्रकमध्ये
सापडली २३ लाखांची दारू
बांदा, ता. १६ ः सातार्डा-सावंतवाडी रस्त्यावर मळगाव येथील एका हॉटेलजवळ उभ्या असलेल्या बेवारस सहा चाकी ट्रकमध्ये तब्बल २३ लाखांची दारू सापडली. राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या पथकाने सोमवारी कारवाई करत ट्रकसह तब्बल ३८ लाख ७६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
खात्याचे जिल्हा अधीक्षक डॉ. बी. एच तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली इन्सुली तपासणी नाक्याचे दुय्यम निरीक्षक पी. एस. रासकर, निरीक्षक एस. पी. मोहिते, अमित पाडाळकर, टी. बी. पाटील, सहायक दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे, जवान संदीप कदम यांनी कारवाई केली.
याबाबत खात्याने दिलेली माहिती अशी - पथकाला मळगाव येथे बेवारस ट्रक उभा असून त्यात दारूचा साठा असल्याची माहिती मिळाली. पथकाने ट्रक (एमएच २४, एयू ०५७७) ची तपासणी केली. ट्रकच्या हौद्यात दारूचा साठा आढळला. पथकाने सात हजार २०० बाटल्या असलेली ६०० खोकी जप्त केली. याची किंमत तब्बल २३ लाख ७६ हजार असून १५ लाख रुपये किमतीचा ट्रक, असा एकूण ३८ लाख ७६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. घटनास्थळी ट्रक चालक किंवा अन्य कोणीही आढळून न आल्याने संशयितला फरार घोषित करण्यात आले. दुय्यम निरीक्षक रासकर तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87571 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..