इन्सुली घाटीत भरधाव ट्रक झाडावर आदळला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इन्सुली घाटीत भरधाव ट्रक झाडावर आदळला
इन्सुली घाटीत भरधाव ट्रक झाडावर आदळला

इन्सुली घाटीत भरधाव ट्रक झाडावर आदळला

sakal_logo
By

43499
इन्सुली ः अपघातग्रस्त ट्रक. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

इन्सुली घाटीत भरधाव
ट्रक झाडावर आदळला
बांदा, ता. १६ ः बांदा-सावंतवाडी मार्गावर इन्सुली येथील संत सोहिरोबानाथ आंबीये मंदिरासमोर भरधाव वेगात ट्रक झाडाला आदळून अपघातग्रस्त झाला. यात सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही; मात्र, ट्रकच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. आज दुपारी ही घटना घडली. ट्रक चालक लोखंडी सामान घेऊन मुंबईतून गोव्याच्या दिशेने जात होता. दुपारी इन्सुली घाटीच्या खाली भरधाव वेगात चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक मंदिरासमोरील झाडावर जाऊन आदळला. यामध्ये ट्रकचे नुकसान झाले. सुदैवाने चालक बचावला. या अपघाताची पोलिसात नोंद करण्यात आली नाही.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87630 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..