वरवडे आयडीयल स्कूलमध्ये स्वातंत्रसैनिकांच्या नाट्यकृती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वरवडे आयडीयल स्कूलमध्ये स्वातंत्रसैनिकांच्या नाट्यकृती
वरवडे आयडीयल स्कूलमध्ये स्वातंत्रसैनिकांच्या नाट्यकृती

वरवडे आयडीयल स्कूलमध्ये स्वातंत्रसैनिकांच्या नाट्यकृती

sakal_logo
By

वरवडे आयडीयल स्कूलमध्ये
स्वातंत्रसैनिकांच्या नाट्यकृती
कणकवली,ता. १७ ः स्वातंत्र सैनिकांच्या नाट्यकृतीतून देशाचा इतिहास आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडेच्या विद्यार्थ्यांनी ‘स्वातंत्र्यादी’ हा अनोखा उपक्रम राबवला. यावेळी उपस्थितांची मुलांनी मने जिंकली.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे प्रशालेतील पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी वेशभूषेतून महात्म्यांच्या जीवनावर नाट्यकृती सादर केल्या. उपविभागीय पोलिस अधीक्षक विनोद कांबळे यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. यावेळी जिल्ह्यात प्रथमच शासकीय कर्मचारी म्हणून नियुक्ती झालेल्या तृतीयपंथी श्रीमती रिया आळवेकर यांचा सत्कार झाला. यावेळी युनियन बँक कणकवलीचे शाखा व्यवस्थापक श्री.सातवसे यांनी प्रशालेच्या यशाचे कौतुक केले. व्यासपीठावर ज्ञानदा शिक्षण संस्था अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे, उपाध्यक्ष मोहन सावंत, कार्याध्यक्ष बुलंद पटेल, संचालक यज्ञेश शिर्के, वरवडेचे सरपंच प्रभाकर बांदल, ग्रामविकास अधिकारी विश्वास पावसकर, संस्था संचालिका मनीषा सावंत, गौसिया बुलंद पटेल, संस्थेचे सल्लागार डी. पी. तानावडे, मुख्याध्यापिका अर्चना देसाई आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87672 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..