बिबट्याच्या धास्तीने खलांतर परिसरात गस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बिबट्याच्या धास्तीने खलांतर परिसरात गस्त
बिबट्याच्या धास्तीने खलांतर परिसरात गस्त

बिबट्याच्या धास्तीने खलांतर परिसरात गस्त

sakal_logo
By

बिबट्याच्या धास्तीने खलांतर परिसरात गस्त
कनेडी,ता. १७ ः भिरवंडे खलांतर खालचीवाडी येथे बिबट्यांचा वावर वाढला आहे. यासाठी वनविभागाचे वनरक्षक अवी राठोड यांच्या पथकाने गेले दोन दिवस या परिसरामध्ये गस्त घालण्यास सुरुवात केली आहे.
भिरवंडे सोसायटीचे चेअरमन तथा गांधीनगरचे माजी सरपंच शेखर सावंत यांच्या निवासस्थानाजवळ गेले काही दिवस बिबट्यांचा वावर होता. याची पाहणी वनविभागाच्या पथकाने केली आहे. या परिसरामध्ये भीतीचे वातावरण आहे. यासाठी वनविभागाकडून पाहणी करून रात्री गस्त घालण्यात आली. फटाके फोडत परिसरातून बिबट्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनही वनविभागाने केले आहे. सह्याद्री पट्टात बिबट्यांचा वावर वाढला आहे. एप्रिल महिण्यात एका शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला होता. त्यामुळे गांधीनगर खलांतरवाडी परिसरात भीती आहे. खरलवाडी परिसरात बाबाजी सावंत यांच्या तब्बल ८० कोंबड्या मे महिन्यात बिबट्याने फस्त केल्या आहेत. आता बिबट्या वस्तीत येत असल्याने भीती व्यक्त होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87674 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..