तांबुळी-डेगवे रस्ता सुरळीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तांबुळी-डेगवे रस्ता सुरळीत
तांबुळी-डेगवे रस्ता सुरळीत

तांबुळी-डेगवे रस्ता सुरळीत

sakal_logo
By

तांबुळी-डेगवे रस्ता सुरळीत
ओटवणे ः तांबुळी-डेगवे मुख्य रस्त्यादरम्यान वनखात्याच्या ताब्यातील रस्ता डांबरीकरणाला निधी असूनही वनखात्याची मंजुरी मिळत नसल्याने हा २०० मीटरचा रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. रस्त्याची सध्या दयनीय अवस्था झाली असून तांबुळी पंचक्रोशीतील वाहन चालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. वाहतुकीसाठी हा महत्त्वाचा मार्ग आहे. तांबुळी, असनिये, घारपी, फुकेरी, झोळंबे, भालावल, कोनशी आदी गावांसाठी बांदा बाजारपेठेत जाण्यासाठी हा सर्वात जवळचा मार्ग आहे. रस्त्याच्या डागडुजीबाबत प्रशासनाचे लक्ष वेधूनही दुर्लक्ष केल्याने अखेर ग्रामस्थांनीच पुढाकार घेऊन रस्ता वाहतुकीस योग्य केला. यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद कामत, माजी नगराध्यक्ष संजू परब यांचे सहकार्य लाभले. श्रमदानात तांबुळी सरपंच माजी सरपंच शिवराम सावंत, माजी अभिलाष देसाई, उपसरपंच बाबू तांबुळकर आदींसह ग्रामस्थांनी सहभाग घेतला.
--------------
मालवणात उद्या भजनी डबलबारी
मालवण ः वायरी भूतनाथ येथील श्री जय भूतनाथ युवा प्रतिष्ठानतर्फे गोपाळकाल्यानिमित्त धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. १९ ला रात्री ९.३० वाजता तेथील भूतनाथ मंदिर येथे डबलबारीचा सामना आयोजित केला आहे. हा सामना वडचीदेवी भजन मंडळ, लिंगडाळचे बुवा संदीप लोके (पखवाज-योगेश सामंत) व वाडेगती भजन मंडळ, बांदेवाडी, देवगडचे बुवा जयप्रकाश गावकर (पखवाज-रितेश पांचाळ) यांच्यात होणार आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
--
वक्तृत्व स्पर्धेस वेंगुर्लेत प्रतिसाद
वेंगुर्ले ः बॅ. खर्डेकर महाविद्यालयात १५ ला समूहनृत्य, समूह गायन आणि राष्ट्रीय एकात्मता नाटिका सादर केले. ‘राष्ट्रभक्ती’, ‘समाजसुधारक’ व ‘राज्यघटना’ विषयी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. यात लक्ष्मी प्रभुखानोलकर (प्रथम), यशोदा परब (द्वितीय) व फाल्गुनी नार्वेकर (तृतीय) यांनी क्रमांक पटकाविले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87702 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..