मंडणगड ः महिलांना कायद्याचे सुरक्षित संरक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंडणगड ः महिलांना कायद्याचे सुरक्षित संरक्षण
मंडणगड ः महिलांना कायद्याचे सुरक्षित संरक्षण

मंडणगड ः महिलांना कायद्याचे सुरक्षित संरक्षण

sakal_logo
By

-rat१७p१५.jpg
L४३७०६
ः मंडणगड ः महिला मेळाव्यात मार्गदर्शन करताना पोलिस निरीक्षक शैलजा सावंत. मेळाव्याला उपस्थित महिला.
-----------------
कायद्याचा आधार घ्या अन निर्भय व्हा

मंडणगडातील मेळाव्यात पोलिस निरीक्षक शैलजा सावंतांचे महिलांना आवाहन; सभागृह तुडूंब
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १७ ः घटनेच्या अधीन राहून महिलांना कायद्याचे सुरक्षित संरक्षण देण्यात आले असून, निर्भयपणे त्याचा उपयोग करून घ्यायला हवा. आधुनिक काळात सतर्क राहून महिलांनी तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मंडणगड पोलिस निरीक्षक शैलजा सावंत यांनी केले.
भिंगळोली येथील श्रीकृष्ण सभागृहात मंडणगड पंचायत समिती व उमेदच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या महिला मेळाव्यात कायदेविषयक मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. हर घर तिरंगा या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रभक्ती निर्माण करणारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या वेळी महिलांचे रक्षणासाठी कायद्यात करण्यात आलेल्या विविध तरतुदी समाजावून सांगताना त्या म्हणाल्या, महिलांनी आपल्यावर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात कायद्याची मदत मागण्याची आवश्यकता व्यक्त केली. मोबाईलचा व समाजमाध्यमाचा वापर ग्रामीण भागातही होत असल्याने या संदर्भात महिलांनी जागरूक राहण्याचा सल्ला देताना आपली खासगी माहिती कोणासह देऊ नये.
तहसीलदार दत्तात्रय बेर्डे यांनी मतदार नोंदणीच्या अभियानाची माहिती देत सर्वांनी लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले. माजी जिल्हा परिषद सदस्या अस्मिता केंद्रे यांनी विधवा प्रथा बंद करण्याच्या पार्श्वभूमीवर तुळशी, पाले या दोन ग्रामपंचायतींनी घेतलेल्या ठरवाचे उदाहरण देत महिलांनी या निर्णयाचे स्वागत करून पाठिंबा देण्याची भूमिका मांडली. कार्यक्रमाला तहसीलदार दत्तात्रय बेर्डे, गटविकास अधिकारी सुवर्णा बागल, नगराध्यक्षा अॅड. सोनल बेर्डे, गटशिक्षणाधिकारी तुकाराम सुतार, पाणीपुरवठा अभियंता प्रतिभा शेरकर आदी उपस्थित होते.
----------
चौकट
महिलांनी जागवली सक्षमीकरणाची उमेद
महिला मेळाव्याला तालुक्यातील ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने महिला उपस्थित राहिल्या. सुमारे ७०० पेक्षा अधिक संख्या झाल्याने सभागृह तुडूंब भरून विचारपीठावर बसावे लागले तसेच सभागृहाबाहेरही महिलांची गर्दी होती. उमेदच्या माध्यमातून बचतगटांमध्ये जागृती निर्माण झाली असून उमेदीने महिला या देशभक्ती कार्यक्रमांत सहभागी झाल्याचे चित्र दिसून आले.
..
चौकट
पोलिसांची मदत घ्या..
महिलांवरील वाढत्या अत्याचारासंदर्भात शैलजा सावंत म्हणाल्या, महिलांनी जागरूक राहणे आवश्यक असून गुन्ह्याच्या पहिल्या टप्प्यातच आपला विरोध दर्शवून कोण, काय म्हणेल, याचा विचार न करता पोलिसांची मदत घेण्याची आवश्यकता व्यक्त केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87707 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..