संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

देव्हारेत महिला मेळावा
मंडणगड ः तालुक्यातील देव्हारे ग्रुपग्रामपंचायतीतर्फे महिला मेळावा झाला. डॉ. आंबेडकर हायस्कूलमधील शिक्षक, लेखक किशोर कासारे यांनी आपले विचार मांडले. स्वातंत्र्य म्हणजे नेमके काय? आपले अधिकार, निर्णय घेणे, मोकळेपणा, न्याय आणि बंधुता त्याचबरोबर भारतीय संविधानाने महिलांना दिलेले हक्क व अधिकार याबाबत त्यांनी आपले विचार मांडले. मानवी जीवन हे अत्यंत दुर्मिळ आहे. त्यामुळे आपले जगणे कुशल करणे व जीवनप्रवास सार्थकी लावणे अगत्य असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक माणसाने माणसाला एकमेकांशी जोडावे. संकुचितपणाच्या सीमेतून बाहेर पडावे आणि एकमेकांना स्नेहाच्या कवेत घ्यावेत, असा संदेश दिला.
------------
विजय खैरे यांची निवड
मंडणगड ः मंडणगड दापोली सामाजिक प्रतिष्ठान ग्रामीणचे अध्यक्ष अरविंद प्रकाश येलवे यांच्या अध्यक्षतेखाली नव्याने ग्रामीण पदाधिकारी नियुक्ती करण्यात आली. सर्वानुमते विजय खैरे यांची ग्रामीण अध्यक्षपदी निवड झाली असून सचिवपदी प्रशांत मर्चंडे यांची नियुक्ती करण्यात आली. बैठकीला विविध विषयांवर चर्चा करून अध्यक्ष अरविंद येलवे यांनी नूतन कार्यकारिणींना सामाजिक कार्य करण्यासाठी प्रोत्साहन दिले.
-----------
संविधानातील कर्तव्यांचा आदर करावा
मंडणगड ः महिलांनी जागरूक राहणे आवश्यक असून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना स्वातंत्र्याने आपणास संविधान, लोकशाही, जगण्याचा अधिकार दिला आहे. आपल्या संविधानाने महिलांना हक्क व अधिकार दिले आहेत. त्याचा आपण सर्वांनी वापर करून सामाजिक ऐक्य वाढीस लावण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन डॉ. शामराव वाघमारे यांनी केले. तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनाद्वारे अंधश्रद्धांना मूठमाती द्यावी. विधवा प्रथा बंद करून त्यांना सामाजिक प्रवाहात सामील करून घ्यावे, असे सांगितले. निगडी येथे मंडणगड पंचायत समितीच्या सहकार्याने उमेद महाराष्ट्र राज्य मंडणगड व खुशी ग्रामसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रमांतर्गत तालुकास्तरीय महिला मेळावा झाला.
---------------
डॉ. आंबेडकर कॉलेजमध्ये स्पर्धा
मंडणगड ः विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवातंर्गत ९ ते १३ ऑगस्ट या कालावधीत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यापैकी मेहंदी, रांगोळी, वक्तृत्व, कथाकथन, पोस्टर मेकिंग आणि देशभक्तीवर गीतगायन आदी स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडले. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेऊन आपल्या सुप्त कलागुणांचे सादरीकरण केले.
--------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87729 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..