मंडणगड ः खेड्यातील मजबूत विचारधारेने देश अखंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंडणगड ः खेड्यातील मजबूत विचारधारेने देश अखंड
मंडणगड ः खेड्यातील मजबूत विचारधारेने देश अखंड

मंडणगड ः खेड्यातील मजबूत विचारधारेने देश अखंड

sakal_logo
By

-Rat१७p१६.jpg
L४३७०७
ः मंडणगड ः गाणे स्वातंत्र्याचे या देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेत बोलताना खासदार सुनील तटकरे.
-------
खालील फोटो वाढाव्यात देणे शक्य
-Rat१७p१७. jpg
L४३७०८
ः स्पर्धेत देशभक्तीपर गीत सादर करताना विद्यार्थी.
--------------
खेड्यातील राष्ट्रभक्तीच्या विचारधारेने देश एकसंघ

खासदार तटकरेंचे प्रतिपादन; देशभक्तीपर कार्यक्रमातून राष्ट्रभक्तीचे वलय
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १७ ः स्वातंत्र्यप्राप्तीनंतर खेड्यापाड्यातून निर्माण झालेल्या राष्ट्रभक्तीच्या मजबूत विचारधारेने देशाची अखंडता कायम राहिली आहे. देशभक्ती अधोरेखित करणाऱ्या कार्यक्रमातून राष्ट्रप्रेमाची अनुभूती आली असून ग्रामीण भागातील गुणवत्ता ही उद्याची देशाची संपत्ती असल्याचे प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी केले. मंडणगड तालुका पत्रकार संघ व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित गाणे स्वातंत्र्याचे या देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेप्रसंगी ते बोलत होते.
खासदार तटकरे म्हणाले, स्वातंत्र्य मिळवण्याची भावना सर्वांच्या मनात होती. बलिदानातून, हुतात्म्यातून मिळालेल्या स्वातंत्र्याला स्वातंत्रलढ्याचा जाज्वल इतिहास व खूप मोठी पंरपरा लाभली आहे. ही बाब आजच्या युवापिढीने समजून घेण्याची आवश्यकता आहे. संविधानाने विविधतेने नटलेला या देशास एकसुत्रतेत बांधले आहे. महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली अंहिसेच्या मार्गाने देशास स्वातंत्र्य मिळाले व पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र भारताने एकसंघ देश म्हणून जगात आपली वाटचाल सुरू केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील सर्व घटनांचा अभ्यास करून तयार केलेल्या घटनेच्या आधारे सार्वभौम प्रजासत्ताक लोकशाही राष्ट्र म्हणून गेली ७५ वर्षे प्रगतीकडे वाटचाल करत आहे.
कार्यक्रमाला माजी आमदार संजय कदम, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, अजय बिरवटकर, तालुकाध्यक्ष मुझफ्फर मुकादम, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस संदीप राजपुरे, मुजीब रूमाने, भाई पोस्टुरे, प्रकाश शिगवण, प्रमोद जाधव, नितीन म्हामुणकर, तहसीलदार दत्तात्रय बेर्डे, गटविकास अधिकारी सुवर्णा बागल, पोलिस निरीक्षक शैलजा सावंत, नगराध्यक्षा सोनल बेर्डे, तालुका वैद्यकीय अधिकारी देविदास चरके, मंडणगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद पवार, दयानंद कांबळे, विजय जोशी, सचिन माळी, विजय पवार आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87738 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..