एसटी अभावी ओटवणेत गैरसोय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसटी अभावी ओटवणेत गैरसोय
एसटी अभावी ओटवणेत गैरसोय

एसटी अभावी ओटवणेत गैरसोय

sakal_logo
By

एसटी अभावी
ओटवणेत गैरसोय
ओटवणे ः देऊळवाडी येथील एसटी वाहतूक आठवडाभरापासून बंद असल्यामुळे याचा त्रास विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना होत आहे. ओटवणे शाळा नं. १ कडून प्रवासी घेतल्यानंतर एसटी बस देऊळवाडी येथील सोमा गावकर यांच्या दुकानाकडे शेवटचा थांबा करते व तेथून प्रवासी घेऊन ओटवणे रवळनाथ मंदिराकडून सावंतवाडीच्या दिशेने रवाना होते; मात्र देऊळवाडी थांब्याकडे बस परतण्याच्या ठिकाणी चिखल झाल्यामुळे चालकाने एसटी नेण्यास नकार दिला आहे. याबाबत सावंतवाडी आगार व्यवस्थापकांना विचारले असता ‘‘जागा सुकल्यावर वाहतूक सुरळीत करू’, असे सांगितले.
---
१२० मुलांची
कान तपासणी
सावंतवाडी ः रोटरी क्लब माहीम आणि सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑडिओ अँड स्पीच थेरपी एक्स्पर्ट डॉ. गुरमीत बांदेकर यांच्या सहाय्याने माजगाव येथील भाईसाहेब सावंत हायस्कूलमध्ये १२० मुलांची कानाची तपासणी करण्यात आली. हायस्कूलचे चेअरमन श्रीमूर्ती कासार, शुभांगी चव्हाण व संपूर्ण शाळेचे सहाय्य लाभले. यावेळी डॉ. गुरमीत बांदेकर, सुमित बछर, अध्यक्षा डॉ. विनया बाड, सचिव प्रमोद भागवत, दिलीप म्हापसेकर उपस्थित होते.
................
नागवे रस्त्यावर
जागोजागी खड्डे
कणकवली ः शहरातील नागवे रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. कणकवलीचे जागृत देवस्थान श्रीस्वंयभू मंदिराकडे जाणाऱ्या नागवे रस्त्यावर पावसाचे पाणी आल्याने रस्ता धोकादायक बनला आहे. बैद्धवाडी, पिळणकरवाडी आणि नागवे, करंजे या गावातील वाहतूक या रस्त्याने होते. तसेच स्वंयभू मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची मोठी संख्या आहे. या रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहने चालवणे धाकादायक आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची डागडूजी गणेशोत्सवापूर्वी करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
--
कणकवलीत
पावसाची उसंत
कणकवली ः तालुक्यात पावसाने आज विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. सखल भागात पाणी साचले आहे; मात्र, पावसाने काडतापाय घेत सूर्यदर्शन झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शहर आणि परिसरात रिमझिम पाऊस वगळता आज पावसाच्या मोठ्या सरी कोसळलेल्या नाहीत. सुर्याचे दर्शन होत होते. त्यामुळे बाजारत खरेदीला गर्दी झाली होती.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87782 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..