रत्नागिरी ः भाजपची साथ आता उदय सामंत यांना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः  भाजपची साथ आता उदय सामंत यांना
रत्नागिरी ः भाजपची साथ आता उदय सामंत यांना

रत्नागिरी ः भाजपची साथ आता उदय सामंत यांना

sakal_logo
By

काल टु १ वर सामंत यांचा फोटो वापरला आहे
...
उलट-सुलट राजकारण .......लोगो
...
भाजपशी जवळीक अपरिहार्य; करावे लागणार परस्पर सहकार्य

रत्नागिरीत उदय सामंत यांना आता भाजपची साथ; एकत्र काम करण्याची ग्वाही

मुझफ्फर खान ः सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १७ ः उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेच्या सर्व निवडणुका भाजपविरोधात लढवल्या आहेत. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या माध्यमातून भाजपच्या जवळ गेले आहेत. त्यांनी रत्नागिरीतील भाजप नेत्यांची मर्जी मिळवली तर भविष्यात राजकारण कोणत्याही दिशेने गेले तरी रत्नागिरी मतदारसंघात त्यांना सक्षम प्रतिस्पर्धी उमेदवार राहणार नाही, असे चित्र आहे. जिल्ह्यातील भाजपला उभारी घेताना सामंत फॅक्टर विचारात घ्यावा लागणार आहे. उलटसुलट राजकारणाचा हा परिणाम आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर निकम यांना अप्रत्यक्षरित्या कशा प्रकारे मदत झाली, हे सावर्डे येथे सामंत यांनी सांगितल्यानंतर चिपळूणमधील शिवसेनेच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी पक्षाच्या बैठकीत सामंत यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यातील काहीजण आता शिंदे गटाच्या तर काहीजण भाजपच्या वाटेवर आहेत. आमदार शेखऱ निकम आणि मंत्री सामंत यांच्यात मैत्रीचे संबंध जुने आहेत. त्यामुळे चिपळूणला निधी देताना सामंत कोणाच्या प्रस्तावाला अधिक प्राधान्य देतील, याकडेही आता सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेत दोन गट निर्माण झाल्यानंतर ठाकरे गटातील आमदार भास्कर जाधव भाजपवर आरोप करत आहेत; मात्र स्थानिक पातळीवर झालेल्या बंडखोरीवर तसेच मंत्री सामंत यांच्याबाबत ते शब्दही काढत नाहीत.
भाजपचे प्रदेश सरचिटणीस नीलेश राणे आणि मंत्री सामंत यांच्यातील राजकीय युद्ध रत्नागिरीत नेहमीच चर्चेचा विषय होता. भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू मंत्री सामंत यांच्यावर टीका करताना जिल्ह्याचे प्रतिपालकमंत्री असा उल्लेख करायचे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मंत्रिपद सांभाळताना केंद्रीय मंत्री नारायण राणेंसारखा सक्षम विरोधक त्यांच्यासमोर होता. त्यामुळे अडीच वर्षात मंत्री सामंत यांनी अपवाद वगळता रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपला फारसे अंगावर घेतले नाही; मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या माध्यमातून विधानसभा निवडणूक लढवताना त्यांच्याविरोधी सक्षम प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचाच होता. आता शिंदे गटाच्या माध्यमातून ते भाजपच्या जवळ गेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील भाजपला उभारी घेताना सामंत यांचाच आधार घ्यावा लागणार आहे. त्यांची भाजपशी जवळीक अपरिहार्य आहे, यातून भविष्यात रत्नागिरी मतदारसंघात त्यांना सक्षम प्रतिस्पर्धी उमेदवार राहणार नाही, असे चित्र आहे.
-----------------
कोट
उद्योगमंत्री उदय सामंत यांना जिल्ह्यातील भाजपचे सहकार्य राहील. त्यांनीही भाजपला सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे. मंत्री झाल्यानंतर ते प्रथम चिपळूणला आले, तेव्हा त्यांनी एकत्र काम करण्याची ग्वाही भाजप कार्यकर्त्यांना दिली. ते पालकमंत्री झाल्यानंतर आमचा आत्मविश्वास वाढणार आहे. भविष्यात भाजप सक्षम होईल.
- संतोष वरेकर, जिल्हा सचिव भाजप
-------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87799 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..