साखरपा ः झेंडावंदनाचा मान सैनिकाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साखरपा ः झेंडावंदनाचा मान सैनिकाला
साखरपा ः झेंडावंदनाचा मान सैनिकाला

साखरपा ः झेंडावंदनाचा मान सैनिकाला

sakal_logo
By

rat१७p८.jpg
43712
ः साखरपा ः युद्धसैनिकांची मुलाखत घेताना विद्यार्थी आणि शिक्षिका प्राजक्ता गद्रे.
......
झेंडावंदनाचा मान माजी सैनिकाला; रंगला कृतज्ञता सोहळा

कबनूरकर स्कूलमध्ये कार्यक्रम; नाईक महेश सावंत; युद्धवीर सुधाकर बेंदरकर, सूर्यकांत पवारांची उपस्थिती
सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. १७ ः देशसेवा म्हणजे केवळ सैन्यात जाणे नव्हे तर जे काम करत असाल, त्यात देशाला प्रथम ठेवून करा, असा सल्ला निवृत्त सैनिक महेश सावंत यांनी विद्यार्थ्यांना दिला. कबनूरकर स्कूलमध्ये झेंडावंदन झाल्यावर घेतलेल्या मुलाखतीत त्यानी आपुले अनुभव कथन केले.
श्रीमान दत्तात्रय कबनूरकर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये यंदा स्वातंत्र्यदिनाच्या झेंडावंदनाचा मान माजी सैनिकांना देण्यात आला. भारतीय सैन्यदलात सिग्नल विभागात सेवा बजावणारे नाईक महेश सावंत यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. या वेळी १९६२, १९६५ आणि १९७१ अशा तीन युद्धांमध्ये लढलेले माजी सैनिक हवालदार सुधाकर बेंदरकर आणि बांग्लादेश युद्धात भाग घेतलेले नाईक सूर्यकांत पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी या तिघांचाही कृतज्ञता सोहळा शाळेतर्फे आयोजित करण्यात आला. नाईक सावंत, हवालदार बेंदरकर आणि नाईक पवार यांचा गौरव करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी या तिघांचीही मुलाखत घेतली. कार्यक्रमाला मुख्याध्यापिका लिना कबनूरकर, चेअरमन श्रीधर कबनूरकर, संस्था सदस्य रमेश ढवळ, महादेव अनावरे, सुरेश गांधी, माजी शिक्षक मधुकर आठल्ये हे उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षिका अनुष्का जोयशी यांनी केले तर आभार प्रदर्शन शिेल्पा होनाळे यांनी केले.
..
चौकट
देशाला सर्वोच्च स्थान ठेवून काम करा...
या वेळी मार्गदर्शन करताना नाईक महेश सांवत म्हणाले की, देशसेवा म्हणजे प्रत्येकवेळी सैन्यात जाऊन लढणे हेच नाही तर ज्या क्षेत्रात काम करत असाल तिथे देशाला सर्वोच्च स्थान ठेवून काम करा, तीच देशसेवा असेल. भार्गवी सुर्वे, कौस्तुभ बने आणि शिक्षिका प्राजक्ता गद्रे यांनी ही मुलाखत घेतली. यानंतर देशभक्तीपर गीते आणि नृत्य सादर करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87807 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..