शैलजा कांबळींची ‘व्यक्तिरेखा’ अव्वल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शैलजा कांबळींची ‘व्यक्तिरेखा’ अव्वल
शैलजा कांबळींची ‘व्यक्तिरेखा’ अव्वल

शैलजा कांबळींची ‘व्यक्तिरेखा’ अव्वल

sakal_logo
By

43784
कुडाळ ः शैलजा कांबळी यांना सन्मानित करताना के. टी. चव्हाण, सुहास वरुणकर, विजय चव्हाण.

शैलजा कांबळींची ‘व्यक्तिरेखा’ अव्वल

कुडाळातील स्पर्धा; ग्रामस्तरीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग

कुडाळ, ता. १७ ः स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवांतर्गत कुडाळ पंचायत समितीने घेतलेल्या ऐतिहासिक व्यक्तिरेखा स्पर्धेत पणदूर बिट २ च्या अंगणवाडी सेविका शैलजा कांबळी विजेत्या ठरल्या. तर देशभक्तीपर गीत, समरगीत स्पर्धा व देशाभिमान जागृत करणाऱ्या सांस्कृतिक स्पर्धा या तिन्ही प्रकारांत पाच संघ सर्वोत्कृष्ट ठरले.
येथील पंचायत समिती पातळीवर समरगीत, राष्ट्रभक्तीगीत व राष्ट्रभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते. यामध्ये पंचायत समितीचे विविध विभागातील तालुकास्तरीय तसेच ग्रामस्तरीय अधिकारी कर्मचारी यांनी या कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. ऐतिहासिक व्यक्तिरेखा स्पर्धेचे उद्‍घाटन मालवण बिडीओ आप्पासाहेब गुजर यांच्या हस्ते झाले. यावेळी गटविकास अधिकारी विजय चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी बाळकृष्ण परब, वैभववाडी सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन भोई, शिक्षक संघटना नेते के. टी. चव्हाण, माजी उपसभापती श्रेया परब, मिलिंद नाईक, दादा साईल, प्रफुल्ल वालावलकर, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी गीता पाटकर-पई, ऐतिहासिक व्यक्तिरेखा स्पर्धेचे परीक्षक नाटककार सुहास वरुणकर, कथक विशारद नृत्यांगना मृणाल सावंत, गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवंडेकर आदी उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल असा ः प्रथम शैलजा कांबळी (मदर तेरेसा), द्वितीय पणदूर बिट २ च्या अंगणवाडी सेविका मनीषा वेंगुर्लेकर (झाशीची राणी लक्ष्मीबाई), तृतीय चंद्रकांत धुरी (बाजी प्रभू), उत्तेजनार्थ जान्हवी गावकर (सावित्रीबाई फुले ) व बाबाजी भोई (छत्रपती शिवाजी महाराज) यांनी मिळविला. स्पर्धेचे परीक्षण सुहास वरुणकर व मृणाल सावंत यांनी केले. समरगीत स्पर्धा सर्वोकृष्ट पाच संघांत पंचायत समिती कुडाळ, शिक्षक हुमरमळा अणाव प्रभाग, शिक्षक कडावल प्रभाग, आयसीडीएस माणगाव-२, आरोग्य विभाग पणदूर यांचा सहभाग घेतला. एकूण २४ स्पर्धक संघ सहभागी झाले होते. देशभक्ती स्पर्धेत शिक्षक हुमरमळा अणाव प्रभाग, शिक्षक वाडोस प्रभाग, संगम प्रभाग संघ नेरूर, आशा कसाल प्रभाग, आयसीडीएस कसाल यांनी यश मिळविले. दोन्ही स्पर्धांचे परीक्षण राजाराम गवाणकर व मोहन मेस्त्री यांनी केले. सांस्कृतिक स्पर्धांमध्ये आयसीडीएस कडावल, आयसीडीएस माणगाव-२, आरोग्य विभाग हिर्लोक phc, आयसीडीएस पणदूर- १, एमएसआएलएम आंब्रड सह्याद्री हे पाच संघ सर्वोकृष्ट ठरले. परीक्षण सुहास वरुणकर व विवेकानंद वाळके यांनी केले. निवेदन प्रफुल्ल वालावलकर यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87809 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..