खारेपाटणमध्ये अमृत महोत्‍सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खारेपाटणमध्ये अमृत महोत्‍सव
खारेपाटणमध्ये अमृत महोत्‍सव

खारेपाटणमध्ये अमृत महोत्‍सव

sakal_logo
By

खारेपाटणमध्ये अमृत महोत्‍सव
खारेपाटण : शहरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून स्वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव साजरा झाला. यात शहरातील शेठ न.म.विद्यालय आणि प्राथमिक शाळांतील मुलांनी तब्‍बल ७५ मिटर लांबीचा तिरंगा घेऊन शहरातून प्रभात फेरी काढली. ही फेरी पाहण्यासाठी नागरिकांनीही ठिकठिकाणी गर्दी केली होती. शेठ न.म. हायस्कूलच्या पंटागणावर प्रमुख ध्वजवंदन कार्यक्रम झाला. यात सरपंच रमाकांत राऊत यांनी तिरंगा फडकवला. त्‍यानंतर देशभक्‍तीपर गायन, वेशभूषा, रांगोळी प्रदर्शन आदी कार्यक्रम झाले. यावेळी विविध क्षेत्रात उल्‍लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्‍कार खारेपाटण ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आला. या कार्यक्रमावेळी खारेपाटण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रविण लोकरे, उपसरपंच इस्माईल मुकादम, मुख्याध्यापक संजय सानप आदी उपस्थित होते. दरम्‍यान, साजरा बाई डोंगरावर सर्वांत उंच ध्वज उभारला होता. तसेच या परिसरात विद्युत रोषणाईही केली होती.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87818 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..