रत्नागिरी- रिसर्च बेस्ट कॉलेज सर्वे क्रमवारीत स्थान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- रिसर्च बेस्ट कॉलेज सर्वे क्रमवारीत स्थान
रत्नागिरी- रिसर्च बेस्ट कॉलेज सर्वे क्रमवारीत स्थान

रत्नागिरी- रिसर्च बेस्ट कॉलेज सर्वे क्रमवारीत स्थान

sakal_logo
By

द वीक हंसा रिसर्च बेस्ट कॉलेज सर्व्हे
क्रमवारीत फिनोलेक्स अॅकॅडमीला स्थान
रत्नागिरी, ता. १७ : द वीक - हंसा रिसर्च बेस्ट कॉलेज सर्व्हे २०२२ च्या सर्वेक्षणात फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजीला मुंबई विद्यापीठामध्ये चौथे स्थान मिळाले आहे. असे स्थान मिळवणारे हे कोकणातील एकमेव अभियांत्रिकी महाविद्यालय ठरले आहे.
महाराष्ट्रातील उत्कृष्ट खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रमवारीत सोळावे स्थान, खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रमवारीत भारताच्या पश्चिम विभागात राष्ट्रीय पातळीवर बावीसावे स्थान, उत्कृष्ट खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रमवारीत राष्ट्रीय पातळीवर १५७ वे स्थान, उत्कृष्ट सरकारी व खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रमवारीत राष्ट्रीय पातळीवर १८३ वे स्थान पटकावले आहे. दरवर्षी देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांचे मूल्यांकन करण्यासाठी सर्वेक्षण केले जाते. या सर्वेक्षणाच्या आधारावर अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दर्जा ठरवला जातो. त्यासाठी यावर्षी देशभरातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातून निवडक महाविद्यालयांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात मुख्यत्वे महाविद्यालयाची मुलभूत माहिती, पायाभूत सुविधा, बौद्धिक संसाधने, प्रशिक्षित शिक्षकवर्ग, शैक्षणिक गुणवत्ता आणि प्रशासन, नोकरीतील संधी, औद्योगिक क्षेत्राशी महाविद्यालयाचा संपर्क आणि संशोधन अभिमुखता या गोष्टीचा विचार करण्यात आला. या यशाबद्दल फिनोलेक्स अॅकॅडमीच्या अध्यक्षा श्रीमती अरुणा कटारा, मॅनेजिंग ट्रस्टी अमृता कटारा व प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद यांनी सर्व प्राध्यापक व कर्मचारीऱ्यांचे अभिनंदन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87838 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..