खेड-रसाळगड, मंडणगड, पालगड, बाणकोटची स्वच्छता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड-रसाळगड, मंडणगड, पालगड, बाणकोटची स्वच्छता
खेड-रसाळगड, मंडणगड, पालगड, बाणकोटची स्वच्छता

खेड-रसाळगड, मंडणगड, पालगड, बाणकोटची स्वच्छता

sakal_logo
By

विधायकः लोगो
...
-rat१७p३७.jpg
43801
ः खेड ः स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेले दुर्गसेविका-दुर्गसेवक.
..
खालील फोटो जागा नसल्यास घेवू नये
-rat१७p३८.jpg
43802
ः रसाळगडावर स्वच्छता करताना दुर्गसेविका-दुर्गसेवक
-----------------
अनोखा स्वातंत्र्यदिन; अमृत महोत्सवानिमित्त स्वच्छता मोहीम

सह्याद्री प्रतिष्ठानचा उपक्रम; रसाळगड, मंडणगड, पालगड, बाणकोटची स्वच्छता
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १७ ः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील शिवछत्रपतीच्या गडकोटांवर सह्याद्री प्रतिष्ठानकडून मोहिमा राबवून अनोखा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील किल्ले रसाळगड, किल्ले मंडणगड, किल्ले पालगड, किल्ले गोवागड, किल्ले बाणकोट या किल्ल्यांवर प्रतिष्ठानकडून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत मोठ्या प्रमाणात कचरा गोळा करण्यात आला. प्रथम गडकोटांचे पूजन करण्यात आले. तसेच गडावरील तोफा, चुन्याचा घाणा येथील गवत काढून सभोवताली परिसरातील प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला. या मोहिमेत किल्ल्यावरील दरवाजे, तटबंदी आदी ठिकाणच्या परिसराची स्वच्छता करून अनोखा स्वतंत्रदिन साजरा करण्यात आला. जमा केलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली तसेच किल्ल्यावर राष्ट्रध्वजही फडकवण्यात आला. रसाळगड मोहिमेत स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
या वेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे सदस्य वैभव सागवेकर, महेश जाधव, रोशन जाधव, संकेत जाधव, अभिजित जाधव, पराग गुरव, निखिल पवार, आकांक्षा आपटे, लीना हिर्लेकर, श्रुती कदम, स्मृती केळकर तसेच दापोली विभागाच्या मोहिमेत पुर्विती पाडलेकर, प्रियांका लाड, रचना मथे, ललितेश दवटे, नंदकुमार झाडेकर, प्रतीक शिर्के, मयुरेश तांबुटकर, साहिल पांचाळ, प्रणय गोंधळेकर, प्रशांत कालेकर, सुशांत कालेकर, सागर रहाटे, ओंकार मोरे, सौरभ झाडेकर उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यातील दिव्येश भोंबल, अनिकेत सुर्वे, सौरभ सुर्वे, अभिषेक सुर्वे, सौरभ पवार, प्रथमेश तळगावकर, केतकी सावंत, अनिरुद्ध डोर्लेकर, अक्षय बापर्डेकर, दर्शन नारकर, ओंकार राड्ये, नंदकुमार साळवी उपस्थित होते. दापोली मोहिमेत स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. अमित महाडिक, प्रशांत कालेकर, सुशांत कालेकर, सागर रहाटे, ओंकार मोरे, सौरभ झाडेकर, अर्णव महाडिक. मंडणगड मोहिमेस मंडणगड तालुका प्रशासक प्रतीक्षा पारधी व विभागातील एकूण २१ दुर्गसेविका/दुर्गसेवक आदी सहभागी झाले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87840 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..