सिंधुदुर्गनगरीत कामगारांचा मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधुदुर्गनगरीत कामगारांचा मोर्चा
सिंधुदुर्गनगरीत कामगारांचा मोर्चा

सिंधुदुर्गनगरीत कामगारांचा मोर्चा

sakal_logo
By

टीपः swt१७२५.jpg मध्ये फोटो आहे.
सिंधुदुर्गनगरी ः कामगार संघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेला मोर्चा.

सिंधुदुर्गनगरीत कामगारांचा ‘एल्गार’

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; विविध मागण्यांकडे वेधले लक्ष

सिंधुदुर्गनगरी, ता. १७ ः राज्यातील कामगारांचे अनेक प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत. ते सोडविण्यासाठी शासनस्तरावर कोणतीही कार्यवाही केली जात नसल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी आहे. आपल्या न्याय मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील कामगार एकवटले असून या कामगारांनी आज भारतीय मजदूर संघाच्या नेतृत्वाखाली ओरोस श्री देव रवळनाथ मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य मोर्चा काढला. यावेळी विविध गगनभेदी घोषणा देत येथील परिसर दणाणून सोडला.
महाराष्ट्र वेतन कोड २०१९ त्वरित लागू करावा, सामाजिक सुरक्षा कोड २०१९ लागू करावा, घरेलू कामगार कल्याणकारी मंडळाचे कामकाज सुरू करावे, राज्यातील अंगणवाडी कर्मचारी व आशा कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करावे, कामगार राज्य विमा योजना सुविधेची अंमलबजावणी करावी, कंत्राटी कामगारांना न्याय मिळावा, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूर्णवेळ सरकारी कामगार अधिकारी द्यावा, बांधकाम कामगारांच्या प्रलंबित आर्थिक लाभाचे प्रस्ताव त्वरित मंजूर करण्यात यावे, ऑनलाईन नोंदणीच्या नावाखाली नियमांमध्ये वारंवार बदल करून कामगारांची ऑनलाईन नोंदणीसाठी होणारी लुबाडणूक थांबवावी, ई-श्रम नोंदणी अभियान पूर्ण करण्यासाठी विशेष नोंदणी अभियान राबवावे, कोरोनाची असंघटित कामगारांना देय असलेली आर्थिक मदत द्यावी आदी मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले होते; मात्र शासनाकडून त्याकडे दुर्लक्ष झाल्याने प्रत्येक जिल्ह्यात कामगारांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मोर्चा काढण्याचे भारतीय मजदूर संघाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत निश्चित केले होते. त्यानुसार आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष विकास गुरव यांच्या अध्यक्षतेखाली ओरोस येथील श्री देव रवळनाथ मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य मोर्चा काढला. यावेळी संघाचे सचिव सत्यजित जाधव, सुधीर ठाकूर, अशोक घाडी, राजेंद्र आरेकर, नंदू झाड, महेश सुर्वे, ओमकार गुरव यांच्याशी शेकडोच्या संख्येने कामगार या मोर्चात सहभागी झाले.
.................
पोलिस बंदोबस्त तैनात
कामगार संघाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात हजारोंच्या संख्येने कामगार सहभागी झाले होते. या मोर्चाच्या बंदोबस्तासाठी सकाळपासून पोलिस प्रशासनाच्या वतीने कडक बंदोबस्त तैनात होता.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87845 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..