रत्नागिरी- निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- निधन
रत्नागिरी- निधन

रत्नागिरी- निधन

sakal_logo
By

-rat१७p३३.jpg
L43795
- संजय शिंदे
-----------
संजय शिंदे यांचे निधन
रत्नागिरी, ता. १७ ः शहरातील सन्मित्रनगर येथील रहिवासी संजय पांडुरंग शिंदे (वय ५२) यांचे मंगळवारी (ता. १६) कोल्हापूरला रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. गेले काही दिवस ते न्युमोनियाने आजारी होते. आज सकाळी त्यांच्यावर रत्नागिरीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, आई, भाऊ, भावजय, पुतण्या असा परिवार आहे. फिनोलेक्स इंडस्ट्रीज कंपनीत सुमारे ३० वर्ष नोकरी करत होते. कंपनीच्या परटवणे येथील कॉलनी ऑफिसमध्ये ते अतिशय प्रामाणिकपणे काम करत होते. त्यांच्या या अचानक, अकाली जाण्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
-----------
- ratchl१७८.jpg-
43814
विक्रांत ताडे
---------
विक्रांत ताडे यांचे निधन
चिपळूण ः शहरातील विरेश्वर कॉलनी येथील विरेश्वर मंदिराचे पुजारी विक्रांत उर्फ काका ताडे (वय ५५) यांचे बुधवारी (ता. १७) पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर बुधवारी दुपारी १२ वाजता रामतिर्थ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. विक्रांत ताडे हे विरेश्वर मंदिरात गेली ३० वर्ष पुजारी म्हणून काम पहात होते. काका ताडे सूर्योदयापूर्वी श्री देव विरेश्वराची पूजा करीत असत. श्री देव विरेश्वराबरोबरच त्यांची श्री देव जूना कालभैरवावर नितांत श्रद्धा होती. गेले काही दिवस ते अल्पशा आजाराने त्रस्त होते. त्यांच्या मागे तीन भाऊ, वहिनी व पुतण्या आहे. त्यांच्या अंतयात्रेत परिसरातील नागरिक, ब्राह्मण सहाय्यक संघाचे पदाधिकारी, श्री देव जूना कालभैरव देवस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87855 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..