रत्नागिरी ः दर्जाहिन रस्ते करणाऱ्या ठेकेदारांवर फौजदारी दाखल करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः दर्जाहिन रस्ते करणाऱ्या ठेकेदारांवर फौजदारी दाखल करा
रत्नागिरी ः दर्जाहिन रस्ते करणाऱ्या ठेकेदारांवर फौजदारी दाखल करा

रत्नागिरी ः दर्जाहिन रस्ते करणाऱ्या ठेकेदारांवर फौजदारी दाखल करा

sakal_logo
By

-rat१७p२७.jpg
४३७६६
-रत्नागिरी ः काँग्रेस भुवन येथील खड्डे श्रमदानातून भरताना काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळा मयेकर, दीपक राऊत, कपिल नागवेकर, महिला पदाधिकारी आदी उपस्थित होते.
---
----------
खड्डेभरणीसाठी काँग्रेसची गांधीगिरी

दर्जाहीन रस्ते करणाऱ्यांवर फौजदारी दाखल करण्‍याची मागणी, श्रमदानातून खड्डे भरून प्रशासनाच्या डोळ्यात अंजन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ ः शहरातील रस्ते २७ कोटी रूपये खर्च करून गुळगुळीत करण्यात आले; मात्र चार महिन्यातच या रस्त्यांची वाताहत झाली. पहिल्याच पावसात रस्त्यांची चाळण झाली. याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्ते अतिशय निकृष्ट दर्जाचे करून जनतेच्या पैशाचा ठेकेदार अपव्यय करत आहेत. या रस्त्याच्या कामाची चौकशी करून दर्जाहीन काम करणाऱ्या ठेकेदारांवर पालिका प्रशासनाने फौजदारी गुन्हे दाखल करावे, अशी संतप्त प्रतिक्रिया काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आणि माजी उपनगराध्यक्ष संजय उर्फ बाळा मयेकर यांनी दिली. आम्ही याबाबत कायदेशीर लढाई देखील लढणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
पालिकेच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्यासाठी बाळा मयेकर यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी काँग्रेसभुवन येथे श्रमदानातून रस्त्यातील खड्डे भरण्यात आले. या आंदोलनाची अनेक नागरिकांनी दखल घेऊन खड्ड्यातून जाताना पालिका आणि ठेकेदाराला लाखोल्या वाहिल्या. यावेळी ओबीसी विभाग प्रदेश उपाध्यक्ष दीपक राऊत, सोशल मीडिया विभाग जिल्हाध्यक्ष कपिल नागवेकर, महिला आघाडीच्या अॅड. आगाशे आदी पदाधिकारी उपस्थित होते. त्यासाठी वाळूचा छोटा ट्रक, सिमेंटची गोण, फावडी, घमेली, पाणी काढण्यासाठी बाळडी, खोरे असे साहित्य घेऊन काँग्रेसभुवन येथील खड्डे भरण्याचे आंदोलन सुरू केले. मयेकर म्हणाले, जनतेच्या पैशाची ही लूट आहे. ठेकेदाराने किती निकृष्ट दर्जाचे रस्ते केले आहेत, हे लक्षात येते. या कामाची चौकशी झाली पाहिजे.
---------------
चौकट-
माजी नगराध्यक्षही सहभागी
श्रमदानातून खड्डे भरत असताना या आंदोलनामध्ये माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर देखील सहभागी झाले. त्यांनी थेट पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर निशाणा साधला. आम्ही दर्जेदार आणि गुळगुळीत रस्ते करू, त्यावरून आरोप करणाऱ्यांनी चालू नका, असे वक्तव्य केले होते. पालिका प्रशासन आणि ठेकेदारांनी एकमेकाच्या हातात हात घालून रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार केला आहे, असा आरोप मिलिंद कीर यांनी केला.
---------
कोट...
रस्त्यांची कामे दर्जाहीन झाल्याने यापूर्वीच आम्ही पालिकेला पत्र देऊन माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवली आहे. जनतेचा पैसा आणि भावनांशी खेळणाऱ्या या प्रशासन आणि ठेकेदाराच्या विरोधात आम्ही कायदेशील लढाई लढणार लढू अन्यथा आमच्या वकिलीचा उपयोग काय?
- अॅड. अश्विनी आगाशे, काँग्रेसच्या महिला संघटक

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87867 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..