रत्नागिरी ः मुख्य बाजारपेठेतील जुने भाजी मार्केट कोणाचे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः मुख्य बाजारपेठेतील जुने भाजी मार्केट कोणाचे?
रत्नागिरी ः मुख्य बाजारपेठेतील जुने भाजी मार्केट कोणाचे?

रत्नागिरी ः मुख्य बाजारपेठेतील जुने भाजी मार्केट कोणाचे?

sakal_logo
By

मुख्य बाजारपेठेतील जुने भाजी मार्केट कोणाचे?

रत्नागिरी पालिकेला दांडेकरांचा सवाल; गैरप्रकार थांबवण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ ः शहरातील मुख्य बाजारपेठेतील जुने भाजी मार्केट नेमके कोणाचे, असा प्रश्न निर्माण करणारा तक्रारअर्ज पालिका मुख्याधिकाऱ्यांकडे दाखल झाला आहे. भाजी मार्केटची अवस्था अत्यंत दयनीय आहे. मार्केटवर व्यापाऱ्याचा बेकायदेशीर ताबा आहे. तेथे प्लास्टिक पिशव्यांचा मोठा साठा आहे. पालिकेने या मार्केटवर आपला कर्मचारी नेमून येथील गैरप्रकार थांबवावेत, असे अशोक दांडेकर (रा. दत्तमंदिर समोर खालची आळी, रत्नागिरी) यांनी अर्जात म्हटले आहे.
शहरातील मुख्य बाजारपेठेतील रत्नागिरी पालिकेचे जुनी भाजी मार्केटची अवस्था अत्यंत दयनीय आहे. येथे व्यापाऱ्याकडे संबंधित भाजी मार्केटची चावी असते. या व्यक्तीने बेकायदेशीररित्या मार्केटवर ताबा मिळवल्याचा आरोप निवेदनात केला आहे. संबंधित व्यक्तीचा या मार्केटशी कोणताही संबंध नाही. रत्नागिरी पालिकेने या व्यक्तीला कोणत्याही स्वरूपाचे अधिकार दिलेले नाहीत. असे असताना देखील ही व्यक्तीने त्या ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांचा मोठा साठा केला आहे. या परिसरात रात्री-अपरात्री गैरप्रकार सुरू असतात. गांजा ओढणे, मद्यपान करणे असे प्रकार त्या ठिकाणी घडतात. त्या ठिकाणी कचऱ्याचे खूप मोठे साम्राज्य पसरलेले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
....
चौकट
स्वतंत्र कर्मचारी नेमा..
संबंधित मार्केट पालिकेचे असून त्यावर पालिकेचा कोणताही अंकुश नाही. हे मार्केट २४ तास सुरू असते. त्यामुळे संबंधित जुने भाजी मार्केटमध्ये पालिकेने स्वतंत्र कर्मचारी नेमून होणारा गैरप्रकार थांबवावा, असे मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारअर्जात दांडेकर यांनी म्हटले आहे. या संदर्भात पालिका मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधला; मात्र ते मुंबईत असल्याने याबाबत त्यांना कोणतीही कल्पना नाही. आपण अर्जाची तपासणी करून योग्य ती कार्यवाही करू, असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87877 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..