औषध प्राशन केल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

औषध प्राशन केल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू
औषध प्राशन केल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू

औषध प्राशन केल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू

sakal_logo
By

औषध प्राशन केल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू
कुडाळ, ता. १७ ः विषारी औषध प्राशन केल्याने कृतिका नीलेश गवाणकर (वय १४, वेताळबांबर्डे-आईनमळावाडी) हिचे कणकवली येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी पहाटे मृत्यू झाला. या घटनेची खबर चंद्रशेखर अनंत देसाई (रा. वरवडे-कणकवली) यांनी कणकवली पोलिस ठाण्यात दिली. कृतिका ही येथील कुडाळ हायस्कूल-ज्युनिअर कॉलेजमध्ये दहावीत शिकत होती. या घटनेने कुडाळ हायस्कूल व वेताळबांबर्डे दशक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. १४ ला सायंकाळी कृतिकाने घरी विषारी औषध प्राशन केले. काहीवेळाने तिला त्रास जाणवू लागल्याने नातेवाईकांनी तिला कणकवली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान तिचे निधन झाले. याबाबत कणकवली पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक तेजस्वी शिंदे तपास करीत आहेत.
--
माड कोसळल्याने वाहतूक ठप्प
मालवण ः येथील बसस्थानक देऊळवाडा या मुख्य मार्गावर एलआयसी ऑफिससमोर मंगळवारी दुपारी माडाचे झाड कोसळले. सुदैवाने मोठा अपघात टळला. सतत वाहतूक असणार्‍या या मार्गावरील धोकादायक झाडे हटवावीत, अशी मागणी माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी वीज वितरण कार्यालय येथे निवेदनाद्वारे करूनही कार्यवाही न झाल्याने अशा घटना घडत आहेत, असा आरोप करत प्रशासनाच्या कारभाराबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मंगळवारी माड रस्त्यात पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली. दीपक पाटकर यांच्यासह युवा सामाजिक कार्यकर्ते अमेय देसाई, वाहतूक पोलीस गुरुप्रसाद परब, अनिकेत आंब्रडकर, नीलेश कुंडाळकर, संदीप मेस्त्री, अंतोन काळसेकर आदींनी मदतकार्य केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87882 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..