पिंगुळीत उद्या दहीहंडी महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंगुळीत उद्या दहीहंडी महोत्सव
पिंगुळीत उद्या दहीहंडी महोत्सव

पिंगुळीत उद्या दहीहंडी महोत्सव

sakal_logo
By

पिंगुळीत उद्या दहीहंडी महोत्सव
कुडाळ, ता. १७ ः साई कला-क्रीडा मंडळ पिंगुळी पुरस्कृत आणि दहिहंडी मित्र मंडळ पिंगुळी यांच्या वतीने शुक्रवारी (ता.१९) पिंगुळी येथे एकमेव भव्य-दिव्य दहीहंडी महोत्सवाचे आयोजन केले आहे. म्हापसेकर तीठा येथील दीपक गावडे यांच्या दुकानासमोरच्या पटांगणात हा दहीहंडी उत्सव सायंकाळी चारपासून सुरू होणार आहे. तहसीलदार अमोल पाठक, पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे, विधी तज्ज्ञ संग्राम देसाई यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उद्‌घाटन होणार आहे. पिंगुळी गावची सात थराची मानाची दहीहंडी फोडणाऱ्या संघास रोख रक्कम २१ हजार व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. यामध्ये दहीहंडीचे जे संघ सहभागी होतील व पिंगुळीच्या या दहीहंडी सलामी देतील त्यामध्ये पहिल्या चार थरांसाठी १५०० रुपये व सन्मानचिन्ह, पाचव्या थरासाठी २००० रुपये व सन्मानचिन्ह, सहाव्या थरासाठी ३००० रपये देण्यात येणार आहे. कार्यक्रमात पिंगुळीवासीयांनी भरघोस प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87929 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..