प्रज्ञा फडकेंची परांकी विजेती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रज्ञा फडकेंची परांकी विजेती
प्रज्ञा फडकेंची परांकी विजेती

प्रज्ञा फडकेंची परांकी विजेती

sakal_logo
By

४३८२३
पावस ः स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्या प्रज्ञा फडके आणि स्पर्धेत भाग घेतलेले पाककला प्रवीण कोकणी.
.....
प्रज्ञा फडकेंची ‘परांकी’ विजेती

रानभाज्यांची पाककृती स्पर्धा; महासंस्कृतीचा पुढाकार

पावस, ता. १७ ः महासंस्कृती, पुणे यांच्यावतीने आरोग्यदायी रानभाज्या आणि कोकणातील पारंपरिक पदार्थ हे सर्वदूर पसरावेत. त्यांचे अस्तित्व टिकून राहाताना त्यांच्याविषयी जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने ‘चव रानभाज्यांची व कोकणातील पारंपरिक पदार्थ’ या पाककला स्पर्धेचे आयोजन केले होते. शुक्रवारी (ता. १२) राममंदिर, पावस येथे पार पडलेल्या या स्पर्धेत प्रज्ञा फडके (परांकी), उदय गोखले (काटल्याचे भरीत), साधना भावे (कणीकुटाची भाकरी आणि मिश्र रानभाज्यांची भाजी) यानी पहिले ३ क्रमांक मिळवले. प्राची जोशी (खुटणीच्या वड्या), सीता गावडे (अळुच्या गाठीची बिर्याणी) याना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.
रानभाज्यांचा वापर करून केलेले पदार्थ व कोकणातील पारंपरिक पदार्थ हे या स्पर्धेचे विषय होते. स्पर्धा सर्वांसाठी खुली असल्याने मोठ्या संख्येने महिला व पुरूषांनी यात सहभाग नोंदवला होता. रानभाज्या कशा ओळखाव्यात, कशा पद्धतीने बनवाव्यात, त्यासाठी लागणारे साहित्य कोणते याची माहिती सर्वांना अवगत नसते. रानभाज्यांची महती आणि माहिती सर्वांना व्हावी, या उद्देशाने महासंस्कृतीच्यावतीने विविध उपक्रम येत्या वर्षात आयोजित करण्याचे ठरवले आहे. परीक्षक म्हणून माधुरीताई देसाई, संजना मराठे यांनी काम पाहिले.
..
चौकट
पारंपरिक पदार्थ नव्या रूपात सादर
स्पर्धकांनी अनेक पारंपरिक पदार्थ, रानभाज्यांचे मोमो, परान्की, अळूच्या पानांच्या गाठीची रोटी बिर्याणी असे फ्यूजन पदार्थ आणि अनेक पारंपरिक पदार्थांना नव्या रूपात सादर केले. यामध्ये रानभाज्यांच्या वापर करून केलेले मोमो, परान्की, काटल्याचे भरीत, खुटणीच्या पानाची वडी आणि भाजी, शेवग्याच्या पानाची वडी, कणीकुटाची भाकरी आणि मिश्र रानभाज्यांची भाजी तर कोकणातील पारंपरिक पदार्थांमध्ये दहिवड्या, रस शेवया, आंबोळी, घावन, घाटलं, भोपळ्याचे घारगे, विविध प्रकारच्या अळूच्या वड्या या स्पर्धेतील विशेष आकर्षण होते.
-------------------------------------
चौकट
संपर्क साधण्याचे आवाहन
कोकणातील कला, संस्कृती, निसर्ग, गृहोद्योग यांसारख्या क्षेत्रात काम करण्याऱ्या संस्था, व्यक्ती यांना कोणत्याही प्रकारचे साहाय्य अथवा मार्गदर्शन हवे असल्यास महासंस्कृतीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन महासंस्कृतीच्या संस्थापक शिल्पा परांडेकर यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y87956 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..